Gandii Baat फेम अभिनेत्री अडकली विवाह बंधनात? फोटो व्हायरल

Gehana Vasisth: गहना वशिष्ठ ही गंदी बात या चित्रपटामुळे आणि पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होती. तिच गहना आता विवाह बंधनात अडकली आहे.  तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यावर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 11, 2023, 03:56 PM IST
Gandii Baat फेम अभिनेत्री अडकली विवाह बंधनात? फोटो व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Gehana Vasisth: 'गंदी बात फेम' आणि पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं चर्चेत येण्याचं कारण तिचा आगामी प्रोजेक्ट नाही. तर तिचं खासगी आयुष्य आहे. गहना वशिष्ठनं विवाह केला आहे. गहनानं फैजान अन्सारी यांच्यासोबत विवाह बंधनात अकडली आहे. तिच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

गहना वशिष्ठ गेल्या अनेक दिवसांपासून फैजान अन्सारीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता तिनं विवाह करत त्यांच्या रिलेशनशिपला नाव दिलं आहे. पण त्या दोघांनी अजून त्यांच्या विवाहाची बातमी ऑफिशियल केलेली नाही. पण अचानक सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाचे फोटो व्हायरल झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, गहनानं इस्लामिक परंपरेनं विवाह केला. गहना वशिष्ठ विषयी बोलायचे झाले तर राज कुंद्रासाठी अश्लील कंटेट बनवण्यात तिचा देखील हात होता असे म्हटले जाते. 

गहनाचा नवरा कोण आहे?

गहनाचा नवरा फैजान अन्सारीबद्दल बोलायचे झाले तर तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता आहे. फैजान अलीकडेच अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या रिअॅलिटी शो 'डेटबाजी' मध्ये दिसला होता. याउलट, गहनाला मुंबई पोलिसांनी काही वेळापूर्वी अडल्ट कॉन्टेन्ट शूटिंग आणि शेअर करण्याप्रकरणी अटक केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गहना वशिष्ठनं राज कुंद्राला देखील समर्थन केलं होतं. जेव्हा तिला अडल्ट कॉन्टेन्ट प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी आलेल्या एका रिपोर्टनुसार, गहनानं राज कुंद्राच्या अॅपसाठी बनवण्यात आलेल्या तीन चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. खरंतर गंदी बात फेम गहनानं सांगितलं की कामुक कंटेन्ट हे अश्लील कॉन्टेन्टपेक्षा वेगळं असतं. 

हेही वाचा : 'या' गाजलेल्या चित्रपटांसाठी Shreyas Talpade नव्हता पहिली पसंत, देवाकडे एकच प्रार्थना करत म्हणाला...

गहनाचं खरं नाव वंदना तिवारी असे असल्याचे म्हटले जाते. तिला 2021 साली पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. वृत्तानुसार, तिच्यावर इतर तीन पुरुषांसोबत मिळून बलात्कारेही आरोप होते. पीडित महिलेनं आरोप केला की त्यांनी तिच्याकडून जबरदस्तीनं पॉर्न फिल्मचे शूटिंग करून घेतले. तिला त्यासाठी मजबूर करण्यात आले. त्याचं दिग्दर्शन हे गहना वशिष्ठनं केलं होतं. तर गहनानं याविषयी बोलताना म्हणाली की बोल्ड आणि इरॉटिक चित्रपटांमध्ये फरक आहे. विवाह करण्यासाठी तिचा धर्म बदलल्याचे देखील म्हटले जाते. तर गहना वशिष्ठ किंवा तिचा नवरा फैजान अन्सारीनं देखील या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिथेच लागल्या आहेत.