'त्या' पोस्टचा नेमका अर्थ काय? काजोलच्या आयुष्यात तर सगळंच सुरळीत...

Kajol Social Media Break: अभिनेत्री काजोल हिनं काही दिवसांपुर्वीच आपण सोशल मीडियावरून ब्रेक घेतो आहोत, असं लिहिले होते. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, तिनं ही प्रेमोशनल स्ट्रॅटेजीसाठी केलं आहे. नेटकऱ्यांनीही असेच सवाल उठवले आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: Jun 11, 2023, 03:41 PM IST
'त्या' पोस्टचा नेमका अर्थ काय? काजोलच्या आयुष्यात तर सगळंच सुरळीत...  title=
फाईल फोटो

Kajol Social Media Break: सध्या काजोल ही अभिनेत्री भलतीच चर्चेत आहे. हल्ली स्टारकीड्सही चांगलचेेच चर्चेत असतात. त्यात चर्चा रंगलेली असते ती म्हणजे काजोलच्या लेकीची म्हणजे न्यासा देवगण हीची. काही दिवसांपुर्वी ती एका आंतरराष्ट्रीय गायिकेच्या कॉन्सर्टला गेली होती. तेव्हा तिच्यासह तिचे मित्र मैत्रीणीही होते यावेळी तिच्या बेस्टेस्ट फ्रेंडनंही हजेरी लावली होती. ज्याचं नाव आहे ऑरी, हा कायमच चर्चेत असतो. परंतु आपल्या लेकीच्या चर्चा सुरू असल्या तरी दोन दिवसांपुर्वी काजोलनंही इंटरनेटवरून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी तिनं एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिनं म्हटलं होतं की, ती आपल्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण प्रसंगातून जाते आहे त्यामुळे तिनं सोशल मीडियावर ब्रेक घेतल्याचेही यावेळी घोषित केले होते. 

यावरून नेटकऱ्यांनी नाना तऱ्हेचे तर्कवितर्क काढले होते. काहींनी तर तिचा आणि अजय देवगणचा घटस्फोट होणार आहे का, इथपर्यंतही चर्चा सुरू केल्या होत्या त्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा सुरू झाली होती. त्यातून तिच्या या पोस्टकरून नेटकऱ्यांनीही नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता काजोल पुन्हा चर्चेत आले आहे. तिनं आपली ही सोशल मीडियावरील पोस्ट शेअर केल्यानंतर तिनं दुसरी एक पोस्ट टाकली आहे. ज्यात ती मेकअप करताना दिसते आणि आपल्या कामाचा वेळ चांगलाच एन्जॉय करताना दिसते आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टनं सगळेच गौंधळले आहेत. अनेकांनी यावेळी तिनं ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी केल्याचे म्हटले आहे. अशाच आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. 

हेसुद्धा वाचा - फारच कठीण प्रसंगातून जातेय म्हणत Kajol चा सोशल मीडियाला रामराम!

विरल भयानीनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की, काजोलनं सगळ्यांनाच टेंशनमध्ये घातलं होतं सोबतच तिच्या घटस्फोटाच्याही चर्चा रंगल्या होत्या परंतु असे कळते की ही पोस्ट तिच्या एका शोसाठीचं प्रमोशन होतं. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, हे फक्त तिच्या आगामी 'अ गुड वाईफ'च्या प्रमोशनसाठी होतं. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं आहे. काही नेटकरी म्हणाले की, या सेलिब्रेटींना लाज कशी वाटतं नाही की, ते अशाप्रकारे फक्त फायद्यासाठी सगळं करतात. तर एका युझरनं म्हणलंय की, तिच्या या पोस्टनं कुणालाच टेंशन आलं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोन दिवसांपुर्वी तिनं एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिनं म्हटलं होतं की, मी माझ्या फारच कठीण काळातून जाते आहे. त्यामुळे मी सोशल मीडियावरून ब्रेक घेते आहे.