Gauhar Khan : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर दिली माहिती

टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे. गौहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.

Updated: Dec 20, 2022, 08:30 PM IST
Gauhar Khan : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर दिली माहिती  title=

Gauhar Khan Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तिच्यानंतर आता आणखीण एक प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार आहे. याबाबत या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. दरम्यान ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घेऊयात. 

टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे. गौहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. या तिच्या घोषणेनंतर चाहते आणि सहकलाकार तिचे अभिनंदन करत आहे.  

अभिनेत्रीच्या पोस्टमध्ये काय?

गौहर खानने (Gauhar Khan Pregnancy) 25 डिसेंबर 2020 रोजी कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्न केले होते. आता या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या पहिल्या मुलाची घोषणा केली आहे. गौहरने पती झैद दरबारला (Zaid Darbar) टॅग करणारा एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हे जोडपे लवकरच दोन ते तीन होणार असल्याची माहिती देण्यात आली. या व्हिडिओमध्ये जैद आणि गौहरच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगण्यात आले आहे.

गौहरने (Gauhar Khan Pregnancy)  व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले की,बिस्मिल्ला हीर रहमान नीर रहीम... तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे..माशा अल्लाह! @pixiedustdesign आमच्या लग्नापासून ते या सुंदर नवीन प्रवासापर्यंत आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

सहकलाकारांकडून कौतूक 

अभिनेत्री गौहर खानने (Gauhar Khan Pregnancy) आई होणार असल्याची घोषणा करताच तिच्या सहकलाकाराकडून तिचे कौतूक करण्यात आले. टीव्ही स्टार किश्वर मर्चंट, सोफी चौधरी, युविका चौधरी, क्रिती खरबंदा यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

गौहरने (Gauhar Khan) सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 7 जिंकला होता. या शोनंतरच ती प्रसिद्धी झोतात आली होती.  याशिवाय गौहर खानच्या 'इशकजादे' चित्रपटातील 'छोकरा जवान रे' आणि 'झल्ला-वल्ला' हे आयटम साँग सुपरहिट झाले होते.

दरम्यान गौहर खानच्या (Gauhar Khan Pregnancy) वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती छोट्या पडद्यासह वेब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही नशीब आजमावतेय. गौहर खानने तांडव, सॉल्ट सिटी आणि बेस्टसेलरसह ओटीटी स्पेस रिलीजसह प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.