'विचित्र आजार होऊन तू तिशीत मरशील', निर्मात्याची अजब भविष्यवाणी

बॉलिवूड अभिनेत्रीने उलगडलं सत्य 

Updated: Oct 21, 2021, 01:24 PM IST
'विचित्र आजार होऊन तू तिशीत मरशील', निर्मात्याची अजब भविष्यवाणी

मुंबई : अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) ने मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. गौहर खानने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या करिअरची सुरूवात करत होती. त्या अगोदर एका निर्मात्याने तिची पत्रिका म्हणजे कुंडली मागितली. ही पत्रिका बघून निर्मात्याने धक्कादायक माहिती गौहरला दिली. 

गौहर खानला एक विचित्र आजार होणार आहे. तसेच ती वयाच्या 30 ते 35 च्या वयात मरणार आहे, अशी भविष्यवाणी एका निर्मात्याने गौहर खानच्या बाबतीत केली होती. 

गौहर खान अलीकडेच '14 फेरे 'चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये विक्रांत मेस्सी आणि कृती खरबंदा दिसले होते. दिलेल्या माहितीनुसार, गौहरला विचारण्यात आले की तिला कधी तिची कुंडली कोणाला दाखवायची आहे का? गौहरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिच्यासोबत असे घडले. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खान म्हणाली, तेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली नव्हती. मी तेव्हा 'झलक दिखला जा' सुद्धा केले नव्हते. तो निर्माता मला एखाद्या गोष्टीत लॉन्च करणार होता. ते एक मोठे आणि सुप्रसिद्ध निर्माता होते, ज्यांना एका चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण मी त्यांचे नाव उघड करणार नाही. ते एका प्रॉडक्शन हाऊसचे नेतृत्व करत होते.

निर्मात्याने केली भविष्यवाणी

गौहरने सांगितले की, निर्मात्याने तिच्या जन्मतारखेचा तपशील मागितला, कोणत्या दिवशी तिचा जन्म झाला आणि ती कुठे झाली आणि त्यानंतर 15 दिवसांनी तिला फोन केला. गौहर म्हणाली, 'त्याने मला बसवले आणि गंभीरपणे सांगितले की, तुझं काहीही होणार नाही. तू चित्रपट करू नको. हे स्वप्न सोड,  आणि काही व्यवसाय कर, असा सल्ला दिला देण्यात आला. 

पुढे निर्माता म्हणाला की,'तऊ 30-35 वर्षांच्या वयात मरणार. ' एवढेच नाही, निर्मात्याने गौहरला सांगितले की जेव्हा ती 30 वर्षांची होईल तेव्हा तिला काही विचित्र आजार होईल, ज्यामुळे ती 30 च्या दशकात पोहोचेल तेव्हा तिचा मृत्यू होईल. पण गौहर त्या निर्मात्याच्या बोलण्यावर हसली आणि तू मला बघ असं म्हणाली.