Guatami Patil : गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार, चित्रपटाचे नाव आले समोर

खुप झाली लावणी...आता चित्रपटात झळकणार, Guatami Patil च्या चित्रपटाची एकच चर्चा  

Updated: Dec 24, 2022, 05:33 PM IST
Guatami Patil : गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार, चित्रपटाचे नाव आले समोर title=
Gautami Patil will soon debut in films name of the film is revealed marathi Entertainment News in Marathi nz

Guatami Patil : लावणी कलाकार आणि इस्टांस्टार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. ती सोशल मीडियावरील (Social Media) लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे. तिचे चाहते तिच्या लावणी कार्यक्रमांना मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळते. अनेकदा तर तिच्या कार्यक्रमांना लोक गंभीर जखमी झाल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. लावणी करताना ती करत असलेले हावभाव अश्लिल असल्यामुळे अनेकदा ती अडचणीत देखील सापडली आहे. त्यासाठी तिला टीकांना देखील समोरे जावे लागले. 

गौतमी पाटील लवकरच चित्रपटांमध्ये 

गौतमी पाटील कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहीली आहे. आलेल्या माहितीनुसार गौतमी पाटील लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वत:च्या तालावर नाचणारी आणि नाचवणारी गौतमी पाटील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचे चाहते तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. तरुणांना आपल्या दिलफेक अंदाजाने वेड लावणारी गौतमीने ही गोड बातमी स्वत:हा तिच्या चाहत्यांना दिली आहे. आलेल्या माहितीनुसार गौतमी घुंगरु या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. तिला काही दिवसांपूर्वीच ही ऑफर आली होती असं खुद्द गौतमीनं सांगितलं. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु

तिनं एका कार्यक्रमात आगामी चित्रपटाविषयी सांगितले की, "लवकरच माझा घुंगरु नावाचा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मी कोणती व्यक्तीरेखा साकारणार आहे ते मी आता सांगू शकत नाही कारण आता सांगितल्यास तुमचा चित्रपटाला घेऊन जो उत्साह आहे तो कमी होईल म्हणून हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात येऊन पाहावा" असं मला वाटते. हा चित्रपट लोककलावंत आणि माझ्यासारख्या कलाकांराच्या जीवनाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. लवकरच शूटींग संपेल आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की यावे असं आवाहन तिनं लोकांना केले आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे गौतमी पाटील?  (Who is Gautami patil)

लावणी, त्यामध्ये केले जाणारे अश्लील हावभाव आणि त्यामुळं होणारे वाद, चर्चा यामुळं गेल्या काही दिवसांपासून सतत नजरा वळवणारी गौतमी मुळची कोल्हापूरची. गेल्या 4-5 वर्षांपासून ती लावणी नृत्यामध्ये सक्रीय असल्याचं कळतं. पण, सोशल मीडियावर तिची हवा पाहता अनेकजण थक्क होतात.