गायिका गीता माळी यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

चाहत्यांना मोठा धक्का.. 

Updated: Nov 19, 2019, 06:48 PM IST
गायिका गीता माळी यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

मुंबई : गायिका गीता माळी यांचा १४ नोव्हेंबर २०१९ रोजी अपघात झाला होता. त्याच्या भरधाव वेगाने आलेल्या कारने एका ट्रकला धडक दिली आणि जागीच माळी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचे पती अॅड. विजय माळी हे या अपघातात गंभीर जखमी झाले. आपला अमेरिकेचा दौरा आटपून भारतात परतल्या होत्या. मुंबईहून नाशिकला येत असताना ही दुर्घटना घडली.

मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन हा अपघात झाला. एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

या अपघातात गीता माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. अखेर तीन दिवसांनंतर त्यांच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.