नवरा असावा तर असा.... रितेश-जेनेलियाचा खास व्हिडिओ

जेनेलिया-रितेशचा खास व्हिडिओ

Updated: Dec 26, 2019, 10:58 AM IST
नवरा असावा तर असा.... रितेश-जेनेलियाचा खास व्हिडिओ

मुंबई : रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोघांना अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं जातं. नुकताच जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जेनेलिया आणि रितेश एकमेकांवर किती प्रेम करतात. 

जेनेलिया आणि रितेशचा हा व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओला 18 तासांत 14 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. It’s never too late to tie a knot अशी कॅप्शन देत जेनेलियाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s never too late to tie a knot #alliwantforchristmasisyou

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

रितेशन जेनेलियाला नेकटाय बांधत आहे. पण ही नेकटाय बांधण्याची पद्धत मात्र अनोखी आहे. ख्रिसमसला हा व्हिडिओ जेनेलियाने शेअर केला आहे. रितेश लाल रंगाची नेकटाय बांधून जेनेलियाचा लूक पूर्ण करत असल्याचं दिसतोय. या व्हिडिओत जेनेलिया अतिशय आनंदी दिसत आहे. जेनेलियाने आपल्या नवऱ्यासोबत शेअर केलेल्या या खास बॉन्डिंगची प्रचंड चर्चा होत आहे. त्यांच्या या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. 

'तुझे मेरी कसम' या सिनेमात पहिल्यांदा रितेश आणि जेनेलियाने एकत्र काम केलं. या दरम्यानच दोघं प्रेमात पडले. 10 वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुलगे आहेत. कामाबद्दल बोलायचं झालं तर रितेश 'बागी 3' या सिनेमात दिसणार असून जेनेलिया सध्या सिनेसृष्टीपासून लांब आहे.