अरबाज खानला इम्प्रेस करण्यासाठी जॉजियाने मलायकाला केलं कॉपी

अभिनेत्री मलायका अरोरासोबतचे त्याचे नाते फार काळ टिकले नाही.

Updated: Aug 27, 2021, 07:23 AM IST
अरबाज खानला इम्प्रेस करण्यासाठी जॉजियाने मलायकाला केलं कॉपी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खानच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक सुंदर मुली आल्या.  त्याचे वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत राहिले. अभिनेत्री मलायका अरोरासोबतचे त्याचे नाते फार काळ टिकले नाही, तर अरबाज खानने त्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंडसोबत अद्याप लग्न केलेले नाही. साहजिकच दोन्ही अभिनेत्री खूप सुंदर आहेत. तर दोघींमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. दोघांनाही टॅटूची आवड आहे पण टॅटू कोणाचे जबरदस्त आहेत? जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची मैत्रीण (Georgia Andriani) जॉर्जिया अँड्रियानीला मोठे आणि अधिक डिझायनर टॅटू बनवण्याची आवड आहे. फोटो झूम न करताही तिचे टॅटू स्पष्टपणे पाहिले जाऊ शकतात.

जॉर्जिया अँड्रियानीला तिच्या मांडीवर मागच्या बाजूला एक मोठा 'धनुष्य' असलेला टॅटू काढला आहे, ज्याला तिने डिझायनर लूक दिला आहे. जेव्हा जॉर्जिया काही शॉर्ट कपडे घालते, तेव्हा तिचा टॅटू स्पष्टपणे दिसून येतो.

याशिवाय, अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने तिच्या कंबरेवर एक सुंदर टॅटूही बनवला आहे. जो अनेक वेळा पाहिला गेला आहे. जॉर्जियाने तिच्या कंबरेवर LOVE असं लिहिले आहे आणि काही फुले बनवली आहेत.
अरबाज खानची एक्स वाईफ मलायका अरोराबद्दल बोलायचं झालं तर , तिला जॉर्जिया अँड्रियानीपेक्षा थोडे लहान आणि TEXT प्रकारचे टॅटू काढायला आवडतात.  मलायका अरोराला तिच्या मनगटावर आणि बोटांवर छोटे टॅटू बनवण्यात आले आहेत, जे फोटोमध्ये दिसून येत आहेत.

जॉर्जियाला ज्याप्रमाणे तिच्या कंबरेवर LOVE लिहिले आहे, त्याचप्रमाणे अरबाज खानची एक्स वाईफ अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या बोटावर LOVE चा टॅटू काढला आहे.

मलायका अरोराने तिच्या कंबरेवर तिसरा टॅटू बनवला आहे. तिच्या कंबरेवर तीन उडणाऱ्या पक्ष्यांचा टॅटू बनवला आहे.