KBC Khan Sir : 'कौन बनेगा करोडपती'मध्ये जेव्हा कोणी सेलिब्रिटी येतात तेव्हा अशा अनेक गोष्टी समोर येतात, जे ऐकूण अनेकांना आश्चर्य होतं. असं आणखी एकदा समोर आलं आले. जेव्हा युट्यूबवर लोकप्रिय असणारे पटनाचे खान सर हे कौन बनेगाा करोडपतीमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी देखील असाच एक किस्सा सांगितला होता. खान सरांनी अमिताभ यांच्या समोर असाच एक किस्सा सांगितला, जे ऐकूण सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला.
केबीसीमध्ये पोहोचलेले खान सर यावेळी अमिताभ यांना त्यांच्या विद्यार्थांचे किस्से सांगताना दिसले. यावेळी त्यांनी मुलींसाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगत एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की एक मुलगी मुंडन करून माझ्याकडे शिकायला आली, तर मला आश्चर्य झालं आणि जेव्हा मी तिला विचारलं की तू केस का काढलेस. तर मुलगी म्हणाली की तिच्या घरचे तिचं शिक्षण थांबवून तिचं लग्न करणार होते. तिनं त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, ते नाही ऐकले त्यामुळे तिनं हा निर्णय घेतला. खान सरांनी याविषयी सांगितलं की लोकांना कळायला हवं की मुलींसाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. कोण म्हणत की कफन (मृत्यूनंतर अंगावर टाकली जाणारी चादर) पांढऱ्या रंगाचं असतं. मी अनेक मुलींना लाल रंगाच्या लहंग्यामध्ये दफन होताना (जीव सोडताना) पाहिलं आहे, असं खान सर म्हणाले. म्हणजेच योग्य वयाआधी, शिक्षण पूर्ण करण्याआधीच या मुलींचं लग्न लावून त्यांची स्वप्न मारली जातात असं खान सरांना सांगायचं होतं. खान सरांचं हे वाक्य ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले.
एक एक शब्द आपको झकझोर देंगे और सोचने पर विवश कर देंगे. pic.twitter.com/rV10Lmu0F2
— Awanish Sharan (@AwanishSharan) September 27, 2023
हेही वाचा : याच चित्रपटामुळं महेश कोठारे झाले होते कंगाल, घरही झालं जप्त; मग 5 वर्षांत जे केल...
हा किस्सा सांगत असताना स्वत: खान सर भावूक होतात आणि बोलतात की लोकांनी हे समजायला हवं की जर देशाला पुढे घेऊन जायचं आहे तर सगळ्या मुलांसोबत मुलींना देखील पुढे यावं लागेल. त्यांनी सांगितलं की जे लोक मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांनी लक्षात घ्यायला हवं की जेव्हा ते त्यांच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात तेव्हा त्यांच्याकडे महिला डॉक्टर शोधण्याचा देखील अधिकार नाही. जेव्हा पासून स्वातंत्र्य मिळालं आहे तेव्हा पासून आपण पुरुष या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण देश पुढे जात नाही आहे. ज्या दिवशी आपल्यासोबत महिला असतील ना त्या दिवशी नक्कीच आपला देश पुढे जाणार.