हास्यजत्रा शोमध्ये परतणार ‘हा’ प्रसिद्ध विनोदवीर; सोशल मीडियावरून दिली गुडन्यूज

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रत्येक घरा-घरात पाहिला जातो. या शोचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आता या कार्यक्रमात एक प्रसिद्ध अभिनेता एन्ट्री घेणार आहे.

Updated: Nov 14, 2023, 04:41 PM IST
हास्यजत्रा शोमध्ये परतणार ‘हा’ प्रसिद्ध विनोदवीर; सोशल मीडियावरून दिली गुडन्यूज title=

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेता ओंकार भोजने घराघरात पोहोचलाय. पण काही दिवसांपूर्वी ओंकार भोजनेने या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. यानंतर ओंकार भोजने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला दिसला. नाटक 'करून गेलो गाव' आणि झी मराठीवरील 'फू बाई फू' या कार्यक्रमात. असं असतानाही प्रेक्षक ओंकार पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात येणार का? अशी वाट पाहत होते. या दरम्यानच ओंकारचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

नुकतीच ओंकारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परतणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. एक व्हिडीओ शेअर करत ओंकारने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, The wait is over... हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल… पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! - दिवाळी स्पेशल, शनि. आणि रवि. रात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

अनेकांनी त्याच्य या पोस्टवर कमेंट्सच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी ओंकारच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, खरं सांगतो ओंकार.. तू हास्य जत्रा सोडून गेल्यापासून sony liv च subscription केलं नव्हतं. तर अजून एकजण म्हणतोय, भावा किती वाट बघायला लावलीस तर अजून एकाने लिहीलंय, एका episode पुरता नको रे MHJ मध्ये कायमचा ये. तर अजून एकाने लिहीलंय, आता खरी शोभा आली शो ला दादा…तू न्हवता तर शो पण न्हवता... तर अजून एकाने लिहीलंय, वा दा व्वा... अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स चाहते अभिनेत्याच्या फोटोवर करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर ओंकारचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.