Guess Who : 'ही' चिमुकली आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री,तुम्ही ओळखलंत का?

बंजारन ड्रेसमध्ये दिसणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलंत का? बॉलीवूड इंडस्ट्रीत दिलेत अनेक हिट चित्रपट 

Updated: Sep 1, 2022, 07:11 PM IST
Guess Who : 'ही' चिमुकली आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री,तुम्ही ओळखलंत का?  title=

नवी दिल्ली: सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.या व्हायरल फोटोत त्यांचे काही प्रौढ फोटो आणि लहाणपणीचे फोटो व्हायरल होत असतात. अशाच एका अभिनेत्रीच्या लहाणपणीचा फोटो आता समोर आला आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री तुम्हाला ओळखता येतेय का पाहा.   

फोटोमध्ये बंजारनच्या ड्रेसमध्ये दिसणारी गोंडस मुलगी मोठी होऊन एक अतिशय सुंदर आणि स्टायलिश स्टार बनली आहे. इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सची हिरोईन म्हणून ती चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने यशराज बॅनरखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र नंतर तिने अभिनयात हात आजमावला. बॉलिवूडची ती आता हिट अभिनेत्री बनलीय. प्रत्येक चित्रपटात ती नव्या भूमिकेत दिसते आणि प्रत्येक भूमिकेत ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय.  

दरम्यान अभिनेत्रीबद्दल इतकं सांगुन तुम्हाला ती कोण आहे याची कल्पना आली असेलच. नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही अभिनेत्री 
भूमी पेडणेकर आहे. या फोटोत छोटी भूमी लेहेंगा घातलेली दिसत आहे. तिच्या डोक्यावर दुपट्टा बांधला आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. भूमीने स्वत: काही वेळापूर्वी इन्स्टा स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला होता आणि त्यासोबत लिहिले होते, "ड्रामा क्वीन फॉर लाइफ असे लिहले होते.  

भूमी पेडणेकरने दम लगा के हैशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर टॉयलेट: एक प्रेम कथा, शुभ मंगल ज्यादा सावधान आणि लस्ट स्टोरीज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता.