'बजरंगी भाईजान' मधील सलमानची छोटी मुन्नी किती मोठी झाली, करिनाच्या गाण्यावर थिरकली

सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली हर्षाली मल्होत्रा  

Updated: May 12, 2021, 03:25 PM IST
'बजरंगी भाईजान' मधील सलमानची छोटी मुन्नी किती मोठी झाली, करिनाच्या गाण्यावर थिरकली

मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली हर्षाली मल्होत्रा  (Haarshali malhotra) सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच तिच्यातील आणखी कला जगासमोर आली आहे. हर्षाली एक उत्तम डान्सर देखील आहे. हर्षाली अर्थात मुन्नीने अभिनेत्री करिना कपूर खानच्या गाण्यात ताल धरला आहे. तिचा हा छानसा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

हर्षालीने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती घरात डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना तिच्या चेहऱ्य़ावरील भाव आणि अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. 

व्हिडिओमध्ये हर्षाली फार सुंदर दिसत आहे. हर्षाली कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. लहान असली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हर्षाली कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.