अभिनेत्री जुही चावला हिची मुलगी एवढी सुंदर दिसतेय की, बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर...

बॉलिवूडकरांची मुलं कायम लाईमलाईटमध्ये असतात. सध्या स्टारकिड्सची चर्चा सर्वत्र रंगत आहे. 

Updated: May 12, 2021, 02:53 PM IST
अभिनेत्री जुही चावला हिची मुलगी एवढी सुंदर दिसतेय की, बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर...

मुंबई : बॉलिवूडकरांची मुलं कायम लाईमलाईटमध्ये असतात. सध्या स्टारकिड्सची चर्चा सर्वत्र रंगत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर, खुशी कपूर, सारा अली खान, शनााया कपूर या सर्व स्टार्सच्या मुली चर्चेत असतात. मग या शर्यतीत अभिनेत्री जुही  चावलाची मुलगी का बरं मागे राहिल. जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता कॅमेऱ्यापासून दूर असली तरी तिची चर्चा रंगत असतात. बॉलिवूडमध्ये येण्याआधिचं तिने सर्वांना घायाळ केलं आहे. जान्हवीला कायम कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्ट्यांमध्ये स्पॉट केलं जातं. 

Know about juhi chawla daughter Jahnavi Mehta

जूही चावला (Juhi Chawla) आणि जय मेहता यांची मुलगी जान्हवी मेहता (Jahnavi Mehta) अतिशय सुंदर आहे. तिने एका आंतरराष्ट्रीयन शाळेत शिक्षण घेतलं आहे. मध्यंतरी जान्हवी एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली होती. जान्हवी मेहता काही वर्षांपूर्वी शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सकरता बोली लावली होती. यामुळे ती खूप चर्चेत आली होती.

जान्हवी, जूही चावला आणि जय मेहता यांची मुलगी आहे. आपल्या शाळेच्या दिवसांत जान्हवी मेहता ही अतिशय अभ्यासू होती. जान्हवी शाळेत रँक होल्डर होती. आपल्या क्लासमध्ये टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये असायची.