मुंबई : साऊथ, बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने हार्मोन्सचे इंजेक्शन घेतल्याचा आरोप हंसिकावर बऱ्याच दिवसांपासून होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हंसिकावर अनेकदा हार्मोनचं इंजेक्शन घेऊन ती मोठी होत असल्याचा आरोप होत आहे. अशा परिस्थितीत हंसिकाने अलीकडेच सांगितलं की, या अफवांचा तिच्या आईवर खोलवर परिणाम झाला आहे.
हंसिकाने सांगितलं की, 'हार्मोनल इंजेक्शन घेतल्याच्या अफवांमुळे आईला त्रास झाला'
याआधी हंसिका अफवांवर स्पष्टपणे बोलली होती आणि याला सेलिब्रिटी असण्याचा नकारात्मक पैलू असल्याचं म्हटलं होतं. अलीकडे, एका नवीन मुलाखतीत, 'अभिनेत्रीने सांगितलं की, जरी तिला या गोष्टींची पर्वा नसली तरी, तिची आई मोना मोटवानी कदाचित यामुळे दुखावली गेली असेल. हंसिका म्हणाली, "मला याचा त्रास झाल्याचं आठवत नाही. मला यात काहीच अडचण नव्हती कारण जर तुम्ही माझ्याबद्दल बोलत असाल तर मी तुमच्यासाठी खरोखरच महत्त्वाची आहे."
हंसिका पुढे म्हणाली, 'माझी आई या घटनेने खूप दुखावली आहे. मी सगळं काही विसरले आहे, पण ती ही घटना विसरू शकत नाही. सोशल मीडियाने तुम्हाला काही बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं तर याचा अर्थ तुम्ही काहीही बोलू शकता असं नाही. लोकं जे काही बोलतात ते फक्त एखाद्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला फरक पडतो.
या चित्रपटापासून करिअरची वाटचाल सुरू झाली
2003 मध्ये रिलीज झालेल्या तब्बूच्या 'हवा' चित्रपटात तिने काम केलं होतं, ज्यामध्ये तिने साशाची भूमिका केली होती. या चित्रपटानंतर त्याच वर्षी हंसिका हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कोई मिल गया' मध्ये दिसली होती.