मुंबई : आज सिल्वर स्क्रीनच्या 'संजू' चा वाढदिवस आहे. कपूर कुटुंबियातील चश्म-ओ- चिराग रणबीर कपूर आज 38 वर्षांचा साला. रणबीरच्या आयुष्यातील संजू हा सिनेमा अतिशय प्रभावी ठरला. त्यामध्ये रणबीरने केलेला अनुभव असो किंवा फिटनेससाठी केलेली मेहनत. रणबीरच्या वाढदिवसादिवशी त्याच्या फिटनेस टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.
1) संजय दत्तचे पर्सनल ट्रेनर कुणाल गिरने एका मुलाखतीत सांगितलं की, रणबीर ऑर्गेनिक अंडी, मांस, भाज्या आणि नट्सपासून तयार झालेलं जेवण दिवसातून पाचवेळा खातं. तो आपलं जेवण छोट्या छोट्या भागात विभागून खातो. त्याची ही सवय मेटाबॉलिज्मला अॅक्टिव ठेवते.
2) रणबीर ताज जेवणं खाणं पसंत करतो. त्याला कोणतंही पॅकेट फूड खायला आवडत नाही. एवढंच काय तर दही आणि पनीर देखील त्याच्यासाठी ताज असतं.
3) रणबीर आपल्या जेवणात हेल्दी पदार्थांचा समावेश ठेवतो. त्याचं जेवण मॅकडामिया अकरोड तेलात बनवलं जातं. हे तेल सर्वोत्तम गुणवत्ता तेलात मोडलं जातं. तसेच या तेलामुळे स्थूलपणा, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधीत आजार होत नाहीत.
4) रणबीर दिवसभर आपल्या शरीराला हायड्रेत ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो दिवसातून अनेकदा पाणी पितो, फळं खातो तसेच अनेक वेळा फळांचा रस देखील घेतो. रणबीर अनेकदा व्यायामानंतर फळ खाणं पसंत करतो.
5) रणबीर खूप फुटबॉल प्रेमी आहे. तो आयएसएलमध्ये एका टीमचा मालक देखील आहे. तो आठवड्यातून 2 वेळा फुटबॉल खेळतो. ज्यातून त्याला फिटनेस बनवून ठेवण्यात मदत होतो. तो नियमितपणे जिमला जाण पसंत करतो. पण फुटबॉल खेळण्याची तो कोणतीही संधी सोडत नाही.
असं म्हटलं जातं की, रणबीरचा वाढदिवस एक दिवस अगोदरच सुरू झाला आहे. करण जोहरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्पेशल सेलीब्रेशनी माहिती दिली आहे.