'मर्द की बॉडी', म्हणत हिणवणाऱ्याला तापसी पन्नूचं सणसणीत उत्तर

त्या एका फोटोमुळे 'थप्पड' गर्ल चर्चेत 

Updated: Sep 21, 2021, 08:22 AM IST
'मर्द की बॉडी', म्हणत हिणवणाऱ्याला तापसी पन्नूचं सणसणीत उत्तर

मुंबई : 'पिंक', 'बदला', 'थप्पड' अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नूने सर्वांना एक  महत्त्वाचा सल्ला दिला आहे. चित्रपटांच्या माध्यमातून अनेकदा तापसीने महिलांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय तापसी कोणत्याही मुद्द्यावर आपलं मांडत असेत. त्यामुळे देखील 'थप्पड' गर्ल चर्चेत असते. पण आता तापसी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तापसीने आताचं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

तापसीच्या या फोटोला काही चाहत्यांनी पसंती दर्शविली तर काहींनी मात्र तापसीला ट्रोल केलं आहे. तापसीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'प्रचंड डोक्यावर चढवून ठेवलं आहे. कुणाचं ऐकत नाही. फक्त स्वतःचं ऐकते. ही एक फार मोठी गोष्ट आहे....' असं लिहिलं आहे. तिच्या या कमेन्टवर एक युजर म्हणाला, 'मर्द की बॉडीवाली फक्त तापसी असू शकते...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

युजरच्या या कमेन्टला तापसीने फार विचार करत सणसणीत उत्तर दिलं आहे. 'मी फक्त एवढंच बोलेल.. ही ओळ लक्षात ठेवा आणि 23 सप्टेंबरची प्रतीक्षा करा.. मला प्रोत्साहन  देण्यासाठी आभारी... यासाठी मी प्रचंड मेहनत केली आहे...'

तापसीचं  हे उत्तर नेटकऱ्यांना फार आवडलेलं आहे. सांगायतचं झालं तर ही पहिलीचं वेळ नाही जेव्हा तापसीला ट्रोल करण्यात आली आहे. याआधी तापसी 'हसीन दिलरूबा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्रोल करण्यात आलं.