हिना खान झाली ट्रोल... युझर्सने का म्हटलं, ओव्हर अॅक्टिंगची दुकान

हिना खानने असं काय केलं? 

हिना खान झाली ट्रोल... युझर्सने का म्हटलं, ओव्हर अॅक्टिंगची दुकान title=

मुंबई : हल्ली सोशल मीडियावर एखादी सेलिब्रिटी टोल होणं हे काही नवीन नाही. प्रत्येक दिवशी कुणी ना कुणी सेलिब्रिटी ट्रोल होतच असतो. मात्र काही कलाकार याकडे लक्ष देतात तर काही जण सहज दुर्लक्ष करतात. आता हिना खान ट्रोल झाली आहे. हिना खान सध्या लंडनमध्ये आपल्या सुट्या घालवत आहेत. तिथले काही फोटो तिने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि याच फोटोवर नेटीझन्सनी तिला ट्रोल केलं आहे.

ट्रोलर्सने हिना खानला ओव्हर अॅक्टिंगची दुकान असल्याचं म्हटलं जातं आहे. एका युझरने म्हटलं आहे की, हिना तू ज्वेलरी चोरून कपडे खरेदी केली आहेस का? किंवा खर्च करण्यासाठी सेक्रेटी ठेवला आहेस. तर एका युझरने म्हटंल की, 'कसौटी जिंदगी की' मधल्या कमोलिका रोल का नाही मिळाला? मात्र काहींनी हिना खानच्या अवताराची तारीफ देखील केली आहे. 

 

 #LondonDiaries

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

एका युझर्सने म्हटलं बिग बॉसच्या अगोदर मी तुझा फॅन होतो. मात्र त्यानंतर तू तुझी दुसरी बाजू दाखवलीस. एवढंच नाही तर युझर्सने हिनाला बॉयफ्रेंड रॉकी जैसवालवरून देखील ट्रोल केलं. एकाने तर हिनाला बंदर म्हटलं आहे. हिनासाठी ट्रोल होणं ही काही नवीन गोष्ट नाही. आता हिना खान या सगळ्यागोष्टीकडे सहज दुर्लक्ष करत असतात.