मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसमुळे 4300 नागरिकांचा मृत्यू झाला असून देशात कोरोनाबाधित लोकांची संख्या ही 60वर गेली आहे. असं असताना आता एका अभिनेत्याला पत्नीसह कोरोनाची लागण झाली आहे.
बुधवारी हॉलिवूड अभिनेता टॉम हँक (Tom Hanks) आणि त्याची पत्नी अभिनेत्री-गायिका रिता व्हिल्सन (Rita Wilson) यांच्या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल आला आहे. दोघांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती. (कोरोना 'जागतिक साथीचा रोग' म्हणून घोषित)
अभिनेता हँक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही ऑस्ट्रेलियात आहेत. त्यांना सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. यामुळे दोघांनी जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची चाचणी केली. दोघांच्या शरिरात कोरोनाने शिरकाव केला असल्याचं चाचणीतून स्पष्ट झालं आहे.
In a statement issued on his Twitter account, actor Tom Hanks also states that his wife & actor Rita Wilson has also tested positive for #coronavirus https://t.co/ya9VcedUG3
— ANI (@ANI) March 12, 2020
63 वर्षीय अभिनेत्याने कोरोना व्हायरसकरता लागणारे सर्व उपचार आपण घेत असल्याचं सांगितलं आहे. हँकने सोशल मीडियावरून सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये मला आणि पत्नी रिताला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे.
चीनमधून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगभरात कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे.