मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. गेल्या ४ महिन्यापासून विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व चिल्लर पार्टी घरात बसून आहे. कोरोना त्यांना त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मज्जा देखील घेता आली नाही. त्याचप्रमाणे मामाच्या गावी देखील जाता आलं नाही. त्यामुळे घरात बसून कंटाळलेल्या या चिमुकल्यांच्या डोक्यात प्रचंड प्रश्नांनी घर केलं आहे. आणि लहान मुलांचे प्रश्न म्हणजे आपली कधी विकेट जाईल काही सांगता येत नाही. आम्हाला कधी आमच्या मित्रांना भेटता येईल. आम्ही खेळायला कधी जावू असे अनेक प्रश्न सध्या त्यांना सतावत आहेत.
गेल्या ४ महिन्यांपासून छोट्यांपासून घरातील ज्येष्ठ मंडळी देखील घरात सुरक्षित राहून कोरोना नष्ट होण्याची वाट पाहात आहेत. आता अशी सर्व परिस्थीती पाहता त्यांच्यासाठी एक पार्टी झालीच पाहिजे, आणि पार्टी पण अशी हवी जी त्यांना घरच्यांसोबत घरातून अनुभवता येईल.
काय म्हणता तयार आहात, चला तर मग झी मराठी बच्चे कंपनीसाठी घेऊन येत आहे एक मजेदार कार्यक्रम "अळीमिळी गुपचिळी चिल्लर पार्टी" ज्यात मुलांसाठी असतील किस्से, गेम्स, गाणी आणि बरचं काही, हा छोटा पॅकेट बडा धमाका तुम्ही पाहू शकणार आहेत २ ऑगस्ट रोजी रविवार संध्याकाळी ७.०० वा. फक्त आपल्या झी मराठी वर.