शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, अभिनेत्रीला आनंद व्यक्त करण्यासाठी मिळालं 'हे' कारण

सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक आपल्या सगळ्यातून निघून जाण्याने शहनाज गिलचं आयुष्य पूर्णपणे सुनं-सुनं झालं आहे.

Updated: Oct 18, 2021, 07:12 PM IST
शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, अभिनेत्रीला आनंद व्यक्त करण्यासाठी मिळालं 'हे' कारण

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक आपल्या सगळ्यातून निघून जाण्याने शहनाज गिलचं आयुष्य पूर्णपणे सुनं-सुनं झालं आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आतापर्यंत शहनाज जिथे-जिथे दिसली तिथे तिच्या चेहऱ्यावर फक्त निराशा होती. तिच्या 'हौसला रख' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही शहनाज खोटी स्माईल करताना दिसली. पण आता सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजला पहिल्यांदा हसण्याचं कारण मिळालं आहे. तिच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करून सगळे विक्रम मोडले आहेत.

कधी रिलीज झाला शहनाजचा चित्रपट?
दिलजीत दोसांझ आणि शहनाज गिल यांच्या 'हौसला रख' या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 15 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या या पंजाबी चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. दसऱ्याच्या एक दिवस आधी चित्रपटाची एकूण कमाई सुमारे 2 कोटी रुपये होती. साहजिकच हा चित्रपट लुधियाना, दिल्ली, चंदीगड आणि अमृतसरमध्ये हाऊसफुल्ल होता.

11 कोटी आकडा केला पार 
या चित्रपटाने शुक्रवारी 5.15 कोटी रुपये जमा केले आणि शनिवारी 5.85 कोटी रुपयांची कमाई केली. अशा प्रकारे रविवारपर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे 12 कोटी रुपये झाले आहे. अभिनेता दिलजीत दोसांझ सतत चित्रपटाबद्दल रिस्पॉन्स आणि रिव्यू शेअर करत आहे.

रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपट
चित्रपटाच्या पोस्टर आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनचा डिटेल्स शेअर करत अभिनेत्याने सोशल मीडियावर लिहिलं की, 'हौसला राख वीरेने सगळे पंजाबी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर इंटरनेशनल कलेक्शन देखील शेअर केलं आणि त्याला कॅप्शन दिलं, 'हौसला रख या आठवड्याच्या शेवटी उत्तर अमेरिकेत बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडते.'

IMDb वर मिळाली एवढी रेटिंग 
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन व्यतिरिक्त,  IMDb वर 10 पैकी 9.5 चित्रपटाला रेटिंग मिळाली आहे. एका युजर्सने IMDb वर लिहिलं की, 'शहनाज बाळा यू जस्ट नेल्ड इट नेल्ड यू रॉक इट बेबी. तुमची अभिव्यक्ती उत्कृष्ट होती, तुम्ही ज्या प्रकारे स्वीटीचे पात्र साकारलं आहे ते कौतुकास्पद आहे. लव्ह यू शहनाज.'