ऋतिक रोशनने शेअर केला बारावी परीक्षेनंतरचा फोटो

ऋतिक रोशन सध्या आगामी 'सिनेमा ३०' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. काल झालेल्या १२ वी परीक्षेनंतर ऋतिकने आपल्या विद्यार्थी आयुष्यातील फोटो शेअर केला.

Updated: Mar 23, 2018, 07:34 AM IST
ऋतिक रोशनने शेअर केला बारावी परीक्षेनंतरचा फोटो

नवी दिल्ली : ऋतिक रोशन सध्या आगामी 'सिनेमा ३०' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. काल झालेल्या १२ वी परीक्षेनंतर ऋतिकने आपल्या विद्यार्थी आयुष्यातील फोटो शेअर केला.

फोटो शेअर 

ऋतिक रोशन सध्या 'सुपर ३०' मध्ये खूप बिझी आहे. पण या व्यस्ततेतून वेळ काढत एक फोटो शेअर केलाय. १२ वी परीक्षेनंतरचा फोटो शेअर करत मनोगतही लिहिल आहे.

गणित घाबरवणारा 

'मी ऐकलय, सीबीएसईच्या १२ वी परीक्षेचा गणिताचा पेपर गेल्यावर्षीपेक्षा सोपा होता. यासाठी बोर्डाच अभिनंदन करायला हवं.

माझ्या विद्यार्थी आयुष्याबद्दल बोलायच तर गणित माझ्यासाठी कठिण आणि घाबरवणारा विषय होता. पण योगायोगाने येणाऱ्या सिनेमात गणिताच्या शिक्षकाची भूमिका करताना मला आनंद होतोय.' असे ऋतिकने म्हटलेय.

येत्या वर्षात रिलीज 

विकास बहल यांच्या दिग्दर्शतेखाली हा सिनेमा बनतोय. शूटींगच पहिल शेड्यूल्ड वाराणसीमध्ये पूर्ण झालयं. येत्या वर्षात हा सिनेमा रिलीज होईल. मृणाल ठाकूर ही अभिनेत्री यातून पदार्पण करतेय.