आजारी इरफान खानचा 'हा' फोटो पाहिलात का?

या फोटोमागचं सत्य 

आजारी इरफान खानचा 'हा' फोटो पाहिलात का?  title=

मुंबई : लंडनमध्ये आजारावर उपचार घेणारा अभिनेता इरफान खान अचानक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याला कारण आहे इरफान खानचा फोटो. सध्या सोशल मीडियावर इरफान खानचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत डोक्याला रूमाल बांधून बसणारा व्यक्ती इरफान खान असल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो लॉर्ड्स स्टेडिअममधला असून इरफान इंग्लंड - पाकिस्तानचा सामना पाहताना दिसत आहे. 

सध्या इरफान खान हा न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर सारख्या गंभीर आजाराशी दोन हात करत आहे. लंडनमध्ये इरफानवर उपचार सुरू आहे. याच वर्षी मार्च महिन्यात सोशल मीडियामार्फत इरफान खानने आपल्या आजाराची माहिती दिली होती. या माहितीनंतर अनेक चाहत्यांची मनं दुखावली गेली होती. 

मात्र हा फोटो सध्या सोशल मीडियावर अफवाह निर्माण करत आहे. हा फोटो पाकिस्तानातील खेळ पत्रकार जैनब अब्बास यांनी शेअर केला आहे. हा फोटो आल्यानंतर असं म्हटलं जातं आहे की इरफान खान लंडनमध्ये पाकिस्तानचा सामना पाहत आहे. 

इरफान खान आपल्याला कारवा या सिनेमातून भेटायला येणार आहे. या सिनेमांत इरफान खान, कृति खरबंदा आणि मैथिली पारकर यांच्यासोबत दिसणार आहे.