बिग बॉसच्या घरात राखीचा पतीसोबत रोमान्स, भान विसरत सगळ्यांसमोर...

राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात

Updated: Dec 11, 2021, 01:57 PM IST
 बिग बॉसच्या घरात राखीचा पतीसोबत रोमान्स, भान विसरत सगळ्यांसमोर... title=

मुंबई : राखी सावंत बिग बॉसच्या 15 व्या सीजनमध्ये मनोरंजन करून चाहत्यांची मने जिंकत आहे. यावेळी राखी सावंत पती रितेशसोबत शोमध्ये आली आहे. तसे, रितेश राखीचा खरा नवरा आहे की, नकली याची चर्चा सुरू आहे. मागच्या एपिसोडमध्ये चाहत्यांना दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पहिल्यांदाच पाहायली मिळाली.

बिग बॉस 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये काय घडले हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या शोमध्ये राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांनी पहिल्यांदाच रोमँटिक क्षण अनुभवले.

राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात रोमान्स करताना दिसला. रितेशने कुटुंबातील इतरांसमोर राखी सावंतला लिप किस केलं. पतीचे हे हावभाव पाहून राखी सावंत लाजली. राखीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

शेवटच्या एपिसोडमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य बागेच्या परिसरात बसले होते. मग राखी सावंत आणि तिचा नवरा एकत्र उभ्या असल्याचे पाहून बाकीचे घरातील सदस्य किस किस किस किस ओरडायला लागतात. यानंतर जे घडले त्यामुळे बीबीचे सर्व चाहते आश्चर्यचकित झाले.

राखी सावंत-रितेश

राखी सावंत आणि तिचा पती रितेश जवळ आले आणि रितेशने राखीच्या ओठांवर किस केले. हे दृश्य पाहून घरातील सर्व सदस्य आरडाओरडा करू लागतात. नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या पतीने किस घेतल्यानंतर राखी लाजेने लाल झाली.

रितेश

राखीचा पती रितेश जेव्हापासून BB15 मध्ये आला आहे, तेव्हापासून त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. सध्या रितेशचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नी आणि मुलांसोबत दिसत आहे...