Bigg Boss OTT Finale: राकेश बापटने अखेर दिली प्रेमाची कबुली?

बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

Updated: Sep 19, 2021, 03:05 PM IST
Bigg Boss OTT Finale: राकेश बापटने अखेर दिली प्रेमाची कबुली?

मुंबई : बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. विनर कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. हा फिनाले अगदी ग्रॅण्ड करण्यासाठी मेकर्सने कोणतीच कसर सोडली नव्हती. स्पर्धकांसह Top5 बिग बॉस ओटीटीच्या फायनलिस्टचे दमदार परफॉर्मन्स यावेळी पाहायला मिळाले. 

 बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खास फिनाले एपिसोडमध्ये या कपलने रोमॅन्टिक अंदाजात आपलं प्रेम जाहीर केलं. दोघांचा डान्स व्हिडिओ कमालीचा चर्चेत आहे. 

ज्यामध्ये दोन्ही स्टार्स रोमँटिक गाण्यावर नाचताना दिसत आहेत. शमिता शेट्टी आणि राकेश बापटने शेरशाहच्या सुपरहिट गाण्यावर 'बिग बॉस ओटीटी' च्या अंतिम फेरीत नृत्य केलं.

बिग बॉस ओटीटीच्या संपुर्ण सीजनच्या या जोडीने आपल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. आणि अखेर शेवटच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये देखील दोघं एकत्र दिसले.