Independence Day 2023: देशभक्ती ही एक अशी भावना आहे. ज्यानं प्रत्येकाचं आयुष्य बदललं. देशभक्तीच्या भावना असतात ना त्या कोणत्याही समुद्राच्या लाटेप्रमाणे आपल्याला उत्स्फृर्त करतात. ही भावना नेहमीच आपल्या हृदयात राहते. त्यात जेव्हा स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन असो, तेव्हा आपल्या सगळ्यांची देशभक्तीची भावना ही खूप वाढते. त्यादिवशी प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर देश भक्तीची गाणी, रील्स शेअर करताना दिसतात. आता स्वातंत्र्य दिन हा काही लांब नाही. आज आपण बॉलिवूडमधील अशी काही गाणी जाणून घेणार आहोत. ज्यावर तुम्ही रील बनवू शकतात. कारण हीच गाणी आहेत जी एखाद्या व्यक्तीच्या मनात देशभक्तीची भावना भरतात.
तेरी मिट्टी (Teri Mitti)
केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी हे गाणं मनोज मुंतशिर यांनी लिहिलेलं आहे. हे गाणं देशभक्तीवर आधारीत असून हे गाणं बी प्राक यांनं गायलं आहे. या गाण्याला संगीत बद्ध अरकोनं केलं आहे. या चित्रपटाच अक्षय कुमार आणि परिणीति चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत.
संदेसे आते हैं (Sandese Aate Hai)
बॉर्डर या चित्रपटातील संदेसे आते हैं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना आणते. हे गाणं फक्त देश भक्तीसाठी नाही तर त्याचसोबत एका सैनिकानं त्याच्या प्रेमीसाठी आणि त्याच्या आईसाठी, कुटुंबासाठी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रेमाच्या भावना आपल्याला त्या गाण्यात पाहायला मिळतात.
मां तुझे सलाम (Maa Tujhhe Salaam)
ए आर रहमान यांनी हे गाणं कंपोझ केलं आहे. हे गाणं 1997 साली प्रदर्शित झालं होतं. हे गाणं मां तुझे सलाम या चित्रपटातील आहे. अभिनेता सनी देओलची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
देश मेरे देश (Desh Mere Desh)
देश मेरे देश हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात आधी देश येतो आणि मग आपण अशी भावना येईल. देशासाठी सगळं काही समर्पण करण्याची भावना येते. हे गाणं द लेजेंड ऑफ भगत सिंह या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
दिल दिया है जान भी देंगे (Dil Diya Hai Jaan Bhi Denge)
हे गाणं सगळ्यांच्या मनात जणू काही घर करून बसलं आहे. म्यूजिकपासून गाण्यापर्यंत सगळ्याच देशभक्तीच्या गाण्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं कर्मा चित्रपटातील आहे. या चित्रपटात दिलीप कुमार यांची महत्त्वाची भूमिका आहे.
आय लव माय इंडिया (I Love My India)
आय लव माय इंडिया हे गाणं परदेश या चित्रपटातील आहे. हे गाणं ऐकल्यानंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपण आपली मातृभूमि सोडून का आलो असा प्रश्न उपस्थित राहतो. हे गाणं हरिहरन कविता कृष्णमूर्ति, शेखर महादेवन आणि आदित्य नारायण यांनी गायलं आहे. तर गाण्याला शब्दबद्ध हे आनंद बक्शी यांनी केले आहे. इतकं लोकप्रिय ठरलेलं गाणं नदीम-श्रवण यांनी संगीत बद्ध केलं आहे. या चित्रपटातशाहरुख खान, अमरीश पुरी आणि महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.
ऐ मेरे वतन के लोगों
हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. देशभक्तीवर असलेलं हे गाणं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलं आहे.
वरील दिलेल्या गाण्यांवर नक्कीच बनवा ट्रेंडिंग रील्स