Disha Pataniच्या मागे फिदा टीम इंडियाचा खेळाडू; डेट करण्याचं स्वप्न

भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारांचं कनेक्शन जवळचं आहे. 

Updated: Jun 26, 2021, 09:47 AM IST
Disha Pataniच्या मागे फिदा टीम इंडियाचा खेळाडू;  डेट करण्याचं स्वप्न title=

मुंबई : भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारांचं कनेक्शन जवळचं आहे. अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्री क्रिकेट खेळाडूंवर फिदा आहेत. अनेक अभिनेत्री याआधी देखील खेळाडूंसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्या आहेत. आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अर्जन नागवासवालाने अभिनेत्री दिशा पाटनीला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिकबझसोबत बोलताना अर्जनने त्याच्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे.  वेगवान गोलंदाज त्याच्या क्रशबद्दल सांगितलं. 

वेगवान गोलंदाज अर्जन नागवासवाला म्हणाला की, 'मला माजी क्रिकेटपटूमध्ये सचिन तेंडुलकर यांच्यासारखी गोलंदाजी करायची आहे.' क्रशबद्दल विचारल्यावर तो  म्हणाला, 'अभिनेत्री दिशा पाटनी माझी क्रश आहे.' शिवाय दिशाला डेट करण्याची इच्छा देखील त्याने यावेळी बोलून दाखवली. त्यामुळे अर्जन नागवासवाला सध्या तुफान चर्चेत आहे.

भारतीय संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आणि इंग्लंड विरुद्ध सामन्यांसाठी अर्जन संघात असणार आहे. अर्जन नागवासवाला वेगवान गोलंदाज आहे. अर्जन गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील नारगोल गावचा रहिवासी आहे. 

अर्जन नागवासवालाने आतापर्यंत 16 फर्स्ट क्लास सामने 20 ए क्लास सामने आणि 15 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 16 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 62, 20 ए क्लासमध्ये 39 आणि टी 20 मध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.