हसणं शिकण्यासाठी अभिनेत्याने खाल्ले लोकलमध्ये धक्के

गोविंदा यांच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. 

Updated: Jun 26, 2021, 09:00 AM IST
हसणं शिकण्यासाठी अभिनेत्याने खाल्ले लोकलमध्ये धक्के

मुंबई  : बॉलिवूडचा कॉमेडी किंग अर्थातचं अभिनेता गोविंदा (Govinda)ने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी जागा प्रस्थपित केली आहे. आज देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.  त्यांचा डान्स असो किंवा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा अंदाज. गोविंदाची बातचं वेगळी. 80 दशकातील सर्व अभिनेते गोविंदापुढे फेल. असं देखील म्हणतात चित्रपटात गोविंदासोबत दुसरा अभिनेता असला तर त्याच्यावर दुर्लक्ष होणारचं. गोविंदा कायम यशाची एक पायरी पुढे चालत राहिले. आज देखील त्यांच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. 

दरम्यान, कपिल शर्माच्या 'कॉमेडी विथ कपिल'च्या सेटवर पोहोचले होते. याठिकाणी कपिल प्रेक्षकांना हासवतो पण इथे तर गोविंदा यांनी कपिलला पोट धरून हासण्यास भाग पाडलं. तेव्हा गोविंदाचं कौतुक करत कपिल म्हणाला, 'गोविंदा जेव्हा चित्रपटांमध्ये  काम करतात तेव्हा त्यांचं अंदाज फार वेगळा असतो. हासण्याचा अंदाज देखील वेगळा असतो. एवढं सगळं कसं करता येतं?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिलच्या या प्रश्नावर गोविंदाने उत्तर दिलं, 'लोकल ट्रेनचे धक्के खाल्ल्यानंतर सर्व काही कळतं. कोठे फिरायला गेल्यासारखं लोकांचं हासू असतं. काही लोकांच्या चेहऱ्या हास्य फिरून फिरून येतं. असं वाटतं काही आडचण तर आली नसेल ना.' यावेळी गोविंदा प्रचंड हासले आणि कपिल शर्मा आणि अर्चना सिंग देखील प्रचंड हासले. 

सांगायचं झालं तर इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना यशाचा शिखर गाठण्यासाठी मोठा खस्ता खावा लागला. गोविंदा आता एक स्टार असला तरी करियच्या सुरूवातील त्यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनचे धक्के खाल्ले आहे.