अरुणितानं सोडली पवनदीपची साथ, तिनं असं का केलं ?

चाहत्यांनाही ही जोडी भावली... 

Updated: Dec 7, 2021, 12:25 PM IST
अरुणितानं सोडली पवनदीपची साथ, तिनं असं का केलं ?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिअॅलिटी शोच्या यादीत 'इंडियन आयडॉल'ची बरीच चर्चा यंदाच्या पर्वादरम्यान झाली. चर्चा होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या, त्यातलीत एक गोष्ट म्हणजे या शोमधील एक सुपरहिट जोडी, अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप रंजन यांची. 

पवनदीप आणि अरुणिता यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांना ऑफस्क्रीन लोकप्रियता देऊन गेली. चाहत्यांनाही ही जोडी भावली आणि पाहता पाहता त्यांच्यातल्या नात्याला अनेक नावं दिली गेली. 

अरुणिता आणि पवनदीपनं अनेक प्रोजेक्टही एकत्र केले, ज्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीला नव्यानं वाव मिळाला. 

पण, आता मात्र अरुणितानं पवनदीपची साथ सोडल्याचं वृत्त समोर येत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार अरुणिताच्या आईला पवनदीपसोबत तिचं नाव जोडलं जाणं मुळीच पसंत नाही. 

परिणामी आगामी म्युझिक व्हिडीओसाठी ज्यावेळी या दोघांनी करारबद्ध होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अरुणिताच्या वडिलांनी एक अट समोर ठेवल्याचं म्हटलं गेलं. 

अरुणिता आणि पनवदीपमध्ये कोणताही इंटिमेट सीन नसल्याची अट समोर ठेवल्यानंतर तिच्या वडिलांना सेटवरच येण्यासही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं. 

पहिल्या म्युझिक व्हिडीओच्या चित्रीकरणावेळी अरुणिताच्या वडिलांनी तिच्यासाठी मॅनेजर अपॉईंट केली. शूटवर प्रत्येकवेळी तिच्यासोबत हजर असणं हा त्यामागचा उद्देश. 

आता म्हणे दुसऱ्या व्हिडीओसाठी अरुणितानं स्पष्ट नकार दिला आहे. बऱ्याच अंशी चित्रीकरण पूर्ण झालेलं असतानाही उर्वरित भागासाठी नकार देण्यात आला आहे. 

अरुणिताकडून आलेला नकार पाहता, सुरानीकडून सदर प्रकरणी तिच्या कुटुंबानं नकार दिल्यामुळं ही परिस्थिती ओढावल्याचं स्पष्ट केलं. 

हा कौटुंबीक निर्णय असला तरीही, तो निराशाजनक आहे असं सुरानीनं स्पष्ट केलं. 

करिअरच्या वाटेवर निघालेल्या अरुणिताला एका वेगळ्यात कारणांसाठी पालकांच्या अट्टहासापोटी एका मोठ्या संधीला मुकली हेच स्पष्ट होत आहे.