B'day Kareena : या अभिनेत्रीला कानाखाली मारून चर्चेत आली करिना कपूर

हा अभिनेता करिनाला अजिबात आवडत नाही 

B'day Kareena : या अभिनेत्रीला कानाखाली मारून चर्चेत आली करिना कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा आज वाढदिवस. करिनाने आज 39 व्या वर्षी पदार्पण केलं आहे. करिनाचा यंदाचा वाढदिवस हा कुठे परदेशात साजरा न होता पतौडी महालात साजरा होणार आहे. या वाढदिवसाची जय्यत तयारी खूप अगोदरपासून सुरू असून आज अनेक बॉलिवूड कलाकार तेथे उपस्थित असणार आहे. 

करिनाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचे बॉलिवूडमधील काही खास किस्से 

1. या सिनेमात अमीषा नाही तर करिना होती... 
साल 2000 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर सिनेमा 'कहो ना प्यार है' मध्ये हृतिक रोशनच्या अपोझिट पहिली पसंती ही करिना होती. परंतु काही दिवसांनी हा सिनेमा अमीषा पटेलच्या पारड्यात पडला. 

2. जेव्हा सरोज खान करिनाला ओरडल्या होत्या
एका मुलाखतीदरम्यान करिनाने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता. एकदा एका डान्सवर नाराज होऊन कोरिओग्राफर सरोज खान रात्री उशिरा फोनकरून करिनाला ओरडल्या होत्या. सरोज खान यांनी तिला कठोर शब्दात सांगिले होते की, तुला डान्स स्टेप्स चांगल्या कराव्याच लागतील. 

3. जेव्हा करिनाचा एमएमएस चर्चेत आला 
शाहिद कपूर आणि करिना कपूरचा लिपलॉक एमएमएस बॉलिवूडच्या टॉप स्कँडल्समधील एक आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी खुलासा केला होता की, हे दोघे आम्ही नसून कुणी दुसरंच आहे. 

4. या अभिनेत्रीला करिनाने कानाखाली लगावली होती
2001 मध्ये करिना आणि बिपाशा बसूमध्ये जोरदार भांडण झालं होतं. या भांडणानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. हा वाद तेव्हाचा आहे जेव्हा या दोघी अभिनेता अक्षय कुमार आणि बॉबी देओलसोबत 'अजनबी' सिनेमात काम करत होते. 

5. सेटवर झाला होता हंगामा 
'अजनबी' सिनेमाच्या सेटवर खूप हंगामा झाला. करिनाने बिपाशाचा कानाखाली लगावली होती. त्यानंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बिपाशाला आपल्या स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास नव्हता. चार पानांच्या मुलाखतीत बिपाशा माझ्याबद्दलच बोलत होती. करिनाने तिला प्रश्न विचारला की, बिपाशा आपल्या कामाबद्दल का नाही बोलली? करिनाचं तर असं म्हणणं होती की, बिपाशाला जी लोकप्रियता मिळाली ती 'अजनबी'सेटवर डिझाइनर विक्रम फडणवीसवरून माझ्यासोबत झालेल्या भांडणामुळेच. 
तर बिपाशाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या प्रकरणावर मला फार काही बोलायचं नाही. 

6. याच्यांतील वाद मिटवण्यास सैफचा पुढाकार 
आता करिना आणि बिपाशा यांच्यातील वाद आता संपला असून या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली आहे. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी सैफची महत्वाची भूमिका होती. 'रेस' सिनेमात सैफ आणि बिपाशा यांनी एकत्र काम केलं असून त्यांच्यात चांगली मैत्री झाली आहे. याचदरम्यान सैफच्या बर्थडे पार्टीला करिनाने बिपाशाला देखील बोलावलं होतं. 

7. करिनाच्यामध्ये हा खराब अभिनेता 
करिनाने सलमान खानसोबत 'बॉडीगार्ड', 'बजरंगी भाईजान सारख्या सिनेमांमधून काम केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं होतं की, मी सलमान खानची चाहती नाही. मला तो आवडत नाही तो खूप खराब अभिनेता आहे. आणि हे मी त्याला कायम सांगते तेव्हा तो यावर हसत असतो. करिनाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.