आर्यनच्या सुटकेनंतर शाहरुखच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; 'मन्नत'वर चाहत्यांची गर्दी

आईच्या नाही वडिलांच्या वाढदिवसापूर्वी आर्यनची जेलमधून सुटका

Updated: Nov 2, 2021, 08:17 AM IST
आर्यनच्या सुटकेनंतर शाहरुखच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; 'मन्नत'वर चाहत्यांची गर्दी title=

मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर खान कुटुंबात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आजचा दिवसही खरं तर शाहरूखच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास आहे. दिवाळी आणि किंग खानचा वाढदिवस एकत्र आल्यामुळे 'मन्नत'वर रोषणाई करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख 56 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी खान कुटुंबावर मोठं संकट कोसळलं होतं. पण आता 'मन्नत'वर आनंद झळकत आहे. 2 ऑक्टोबर रोजी आर्यनला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पण सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून सतत आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला जात होता. पण अखेर 25 दिवसांनंतर आर्यनल जामीन मिळाला. जेव्हा आर्यन अडचणीत अडकला होता, त्यादरम्यान गैरी खानचा वाढदिवस होता. पण आर्यन जेलमध्ये असल्यामुळे त्यांना वाढदिवस साजरा करता आला नाही. पण दिवाळी आणि शाहरुखच्या वाढदिवसाआधी आर्यनला जामीन मिळाल्यानंतर संपूर्ण एकत्र दिवाळी आणि  शाहरुखचा वाढदिवस साजरा करणार आहेत. 

नेहमी प्रमाणे शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मन्नत बाहेर गर्दी केली आहे. खान कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र शाहरुख यंदाचा वाढदिवस अलिबागमधील त्याच्या बंगल्यात साधेपणाने साजरा करणार असल्याचे बोललं जात आहे.