सैराटचं हिंदी व्हर्जन 'धडक'चा ट्रेलर रिलीज...

दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे. 

Updated: Jun 11, 2018, 01:33 PM IST
सैराटचं हिंदी व्हर्जन 'धडक'चा ट्रेलर रिलीज...

 मुंबई : दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. धडक सिनेमात जान्हवीसोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमाच्या ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षक, चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

दोन वेगवेगळ्या वर्गातील जोडप्याची ही प्रेमकहाणी आणि त्यांचा संघर्ष आहे. जान्हवीचा हा पहिलाचा सिनेमा असला तरी तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सुपरडुपर हिट मराठी सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे. सैराटमध्ये दोन्ही प्रेमींना प्रेमाची किंमत जीव देऊन चुकवावी लागते. धडकमध्येही असेच होणार का?

पहा ट्रेलर...

श्रीदेवींच्या निधनानंतर सावत्र भाऊ अर्जुन कपूरसोबत जान्हवी आणि खुशीची जवळीक वाढली. अर्जुन सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनमध्ये असला तरी त्याने ट्वीट करुन जान्हवीला शुभेच्छा दिल्या आहेत. 
२०१६ मध्ये आलेल्या सैराट या मराठी सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमाने मराठीतील सर्व रेकॉर्ड मोडत ११० कोटी रुपयांची कमाई केली होती. महत्त्वाचे म्हणजे या सिनेमाचे बजेट फक्त ४ कोटी इतकेच होते.