धडकच्या ट्रेलर लॉन्चला ईशान-जान्हवीची रोमांटिक एन्ट्री...

दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे.

Updated: Jun 11, 2018, 01:06 PM IST
धडकच्या ट्रेलर लॉन्चला ईशान-जान्हवीची रोमांटिक एन्ट्री...

मुंबई : दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटला ती पोहचली आहे. धडक हा अतिशय बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. 

याप्रसंगी जान्हवी कपूरने हिरव्या रंगाचा सूट परिधान केला आहे. सिनेमातही जान्हवी इंडियन लूकमध्ये दिसेल. या देसी लूकमध्ये जान्हवी अत्यंत सुंदर दिसत आहे.

 

@janhvikapoor @ishaan95 at the trailer launch of #dhadak . #janhvikapoor #ishaankhatter #shashankkhaitaan #karanjohar #dharmamovies

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

या इव्हेंटला निर्माता करण जोहरही पोहचला. सिनेमाची निर्मिती करण जोहर प्रॉडक्शन, अपूर्व मेहता आणि झी स्टुडिओने एकत्रितपणे केली आहे. सिनेमता जान्हवीसोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहे. ट्रेलर लॉन्चिंगला दोघेही एकत्र पोहचले. ईशानचा हा दुसरा सिनेमा आहे.

धडक हा सिनेमा पूर्वी ६ जुलैला प्रदर्शित होणार होता. पण आता तो २० जुलैला प्रदर्शित होईल. सुपरडुपर हिट मराठी सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे. २०१६ मध्ये आलेल्या सैराट या मराठी सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमाने मराठीतील सर्व रेकॉर्ड मोडत ११० कोटी रुपयांची कमाई केली होती. महत्त्वाचे म्हणजे या सिनेमाचे बजेट फक्त ४ कोटी इतकेच होते.