शब्द कळले नाहीत तरीही, म्यूझिकवर ठेका धराय लावणारं व्हायरल सॉन्ग

....अखेर कलेला कोणती भाषा नसते हेच खरे. अनेक लोक हे सिद्ध करून दाखवा असेही म्हणतील. पण, सिद्धच करायचे म्हटले तर, हा व्हिडिओ आपण नक्की बघू शकतो. जो बातमीच्या खाली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 6, 2018, 11:18 PM IST
शब्द कळले नाहीत तरीही, म्यूझिकवर ठेका धराय लावणारं व्हायरल सॉन्ग title=

मुंबई : ....अखेर कलेला कोणती भाषा नसते हेच खरे. अनेक लोक हे सिद्ध करून दाखवा असेही म्हणतील. पण, सिद्धच करायचे म्हटले तर, हा व्हिडिओ आपण नक्की बघू शकतो. जो बातमीच्या खाली आहे.

म्यूझिकची सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती असेल तर, तो त्याचा ठेका. कोणत्याही म्यूझिकचा ठेका एकदा का व्यक्तीच्या डोक्यात गेला की, त्याला ताल धरण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. काहीसे असेच झाले, मल्याळम चित्रपट Velipadinte Pusthakam मधील गाणे रिलीज झाले तेव्हा. 

खरी मजा तेव्हा आली जेव्हा, Indian School of Commerce (ISC)च्या काही महिला टीचर्सनी या गाण्यावर जबरदस्त आणि तितकाच लक्षवेधी डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला. विशेष असे, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, गेल्या वर्षी युट्यूबवर पाहिला गेलाला हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ ठरला. आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर, नक्की पाहा. त्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.