जुही चावला शुटिंगदरम्यान प्रेग्नेंट, सेटवर गरोदरपणातही...

गरोदरपणात जुही चावलावर अली अशी वेळ, तरीही पूर्ण केली जबाबदारी  

Updated: Nov 28, 2021, 11:14 AM IST
जुही चावला शुटिंगदरम्यान प्रेग्नेंट,  सेटवर गरोदरपणातही...

मुंबई : आज कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपलं करियर सांभाळत खासगी आयुष्याला देखील प्रचंड महत्त्व दिलं. अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेग्नेंसीमध्ये अवस्थेतही शूटिंग केलं. हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री जुही चावलासोबत देखील हा प्रकार घडला. प्रेग्नंट असूनही जुही पोटात बाळ घेऊन काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, फिल्मस्टार झंकार बीट्सच्या शूटिंगदरम्यान जुही चावला गरोदर होती.

करियर संबंधी तिच्या उत्कटतेची कहाणी कधीच समोर आली. जुहीने महिला असल्याची प्रत्येक जबाबदारी वेळेनुसार पार पाडली. जुहीसारख्या इतर अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेग्नंट होत्या आणि त्यांनीही त्याच अवस्थेत आपली भूमिका पूर्ण केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जूही चावलाने आपल्या करिअरची सुरुवात 1986 मध्ये आलेल्या 'सल्तनत' चित्रपटातून केली होती. तिने 1984 मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला. जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केलं. जुही आणि जय हे दोन मुलांचे पालक आहेत.

जुही आता चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. जुही कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.