close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्चीच्या 'कागर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'सौराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.

Updated: Apr 3, 2019, 10:53 AM IST
अर्चीच्या 'कागर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : 'सौराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. नुकताच तिच्या आगामी 'कागर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही क्षणांतच 'कागर' चित्रपटाचा टीझर चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित करण्यात आला. आता हा टीझर चांगलाच व्हायरल होत आहे. राजकारणावर आधारलेल्या या चित्रपटात प्रेमाची किनार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रिंकूच्या 'सौराट' चित्रपटाला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 

'कागर' चित्रपट राजकारणावर आधारलेला असला तरी टीझरमध्ये 'सौराट' चित्रपटाची चाहूल पाहायला मिळत आहे. चित्रपटात रिंकूची बोलीभाषा चाहत्यांना पुन्हा 'कागर' चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपटात रिंकू एका नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाचे शुटिंग रिंकूच्या अकलूजमध्ये करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी केले आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'कागर' चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.