VIDEO : आलिया भट्टला कोण म्हणालं 'आलिया कपूर'?

या व्हिडिओची होतेय चर्चा 

VIDEO : आलिया भट्टला कोण म्हणालं 'आलिया कपूर'?

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरमधील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्याचे पुरावे देखील जगासमोर येत आहेत. मग ते रणबीरच्या आजीचं निधन असो किंवा दोघांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ असो. बॉलिवूडच्या प्रत्येक कार्यक्रमात यांची चर्चा होत आहे. मात्र अद्याप आलिया किंवा रणबीरने आपल्या नात्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं नाही. पण अभिनेत्री काजोल एका कार्यक्रमात असं काही बोलून गेली की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. 

काजोलच्या या बोलण्यामुळे आलिया - रणबीरच्या नात्याला खरा अर्थ मिळाला की काय असं वाटत आहे. नेहा धूपियाचा 'नो फिल्टर नेहा' हा शो लवकरच सुरू होणार आहे. या शोवर काजोल देखील पोहोचली आहे. या शोचा एक प्रोमो नेहाने शेअर केला आहे. त्यामध्ये नेहाने काजोलला आलियाशी संबंधित एक प्रश्न विचारला. 

याबाबत उत्तर देताना काजोलने एक गंमतच केली आहे. काजोलला जेव्हा नेहा प्रश्न विचारते तेव्हा काजोल अगदी गडबडीत, आलिया कपूर , सॉरी.... सॉरी आलिया भट्ट असं बोलताना दिसत आहे. काजोल असं बोलताच नेहाला आपलं हसू आवरलं नाही. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'ब्रम्हास्त्र' या सिनेमांत एकत्र काम करणार आहे. अयान मुखर्जी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.