मद्यधुंद धर्मेंद यांना 'त्या' वाईट कृतीसाठी अभिनेत्रीनं लगावलेली कानशिलात

बॉलिवूडमध्ये अनेक अशा घटना घडतात ज्यांचे किस्से  कायम चर्चेत असतात. 

Updated: Sep 24, 2021, 11:21 AM IST
मद्यधुंद धर्मेंद यांना 'त्या' वाईट कृतीसाठी अभिनेत्रीनं लगावलेली कानशिलात

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अशा घटना घडतात ज्यांचे किस्से  कायम चर्चेत असतात. त्यामध्ये बॉलिवूडकरांचे प्रेमप्रकरण, त्यांचे वाद, एकमेकांचे शत्रू या व्यतिरिक्त सेट घडणारे अनेक किस्से कालांतराने सर्वांसमोर येतात. आता ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्र आणि तनुजा यांचा एक किस्सा तुफान चर्चेत आला आहे. सेटवर अशी वेळ आली जेव्हा तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या  कानशिलात लगावली. तनुजा यांनी वयाच्या अवघ्या 16 वर्षी  कलाविश्वात पदार्पण केलं. अभिनेत्री होण्यासाठी त्यांनी शिक्षण देखील सोडलं. 

धर्मेंद्र आणि तनुजा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. धर्मेंद्र सेटवर अभिनेत्रींसोबत कायम मस्ती आणि छेडछाड करायचे. 1965 ची गोष्ट आहे, जेव्हा तनुजा आणि धर्मेंद्र 'चांद और सूरज' चित्रपटाचे शूटिंग करत होते. या दरम्यान असे काही घडले की तनुजा यांनी रागाच्या भरात धर्मेंद्र यांच्या कानशीलात लगावली.

एका मुलाखती दरम्यान, तनुजा यांनी सांगितले की, 'धर्मेंद्र आणि मी मित्रांसोबत मद्यपान करत होतो आणि खूप मजा करत होतो. त्यांनी माझी पत्नी प्रकाश कौरशी माझी ओळख करून दिली. एक दिवस त्यांनी माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्यांच्या कानशीलात लगावली.  सध्या एकेकाळी रूपेरी पडदा गाजवणाऱ्या कलाकारांचा हा किस्सा तुफान व्हायरल होत आहे. 

तनुजा यांच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 'आज और कल', 'दो चोर, दो दूनी चार', 'बहारें फिर भी आएंगी', 'घराना', 'हाथी मेरे साथी', 'ज्वैल थीफ', 'जियो और जीने दो', 'प्रेमरोग', 'खुद्दार', 'सन ऑफ सरदर'  अशा एकापोक्षा एक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.