Pakistani Actor चा Kajol सोबत लिपलॉक; अभिनेता म्हणाला, 'आम्ही अनेक...'

Pakistani Actor नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. याशिवाय Kajol ही त्याची लहानपणीची बॉलिवूड क्रश असल्याचे म्हटले होते.  

Updated: Jan 19, 2023, 02:49 PM IST
Pakistani Actor चा Kajol सोबत लिपलॉक; अभिनेता म्हणाला, 'आम्ही अनेक...' title=

Kajol's Kissing Scene With Pakistani Actor Alyy Khan : बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे (Kajol) लाखो चाहते आहेत. काजोलनं आता पर्यंत अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. लवकरच काजोल एक पाकिस्तानी अभिनेत्यासोबत (Pakistani actor) मोठ्या स्क्रिनवर दिसणार आहे. या अभिनेत्याचे नाव अली खान (Pakistani Actor Alyy Khan) असे आहे. हा चित्रपट 'द गुड वाईफ' (The Good Wife) या सुपरहिट शोचे हिंदी रिमेक (Hindi Remake) आहे. दरम्यान, अलीनं एका मुलाखतीत काजोलसोबत किसिंग सीन शूट केल्याचे खुलेपणाने सांगितले. इतकंच नाही तर काजोल ही त्याची बालपणीचं प्रेम आहे असा खुलासा त्यानं केला आहे. 

अलीनं नादिर अलीच्या पॉडकास्टसाठी दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, काजोल ही एकमेव अभिनेत्री आहे जिच्यावर तिचं क्रश आहे. यावेळी अलीनं बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत काम करण्याविषयी आणि त्यासोबतच 'द आर्चीज' या मल्टीस्टारर चित्रपटात काम करण्याबद्दल सांगितले आहे. पुढे काजोलसोबत असलेल्या अटॅचमेंटबद्दल बोलताना अली म्हणाला, 'मी लहान असताना काजोल माझी आवडती अभिनेत्री होती.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अली खान पुढे म्हणाला, 'जवळपास गेल्या 3 दशकांपासून मी तिचे काम पाहत आलो आहे. इतकंच काय तर मी असे ऐकले होते की काजोल खूप रागीट स्वभावाची आहे. आता एका सीरिजचे शूटिंग केल्यानंतर तिला जवळून ओळखण्याची संधी मला मिळाली. तर या मालिकेत अलीनं काजोलच्या बॉयफ्रेण्डची भूमिका साकारली आहे. यावेळी माझा काजोलसोबत एक किसिंग सीनही आहे. 

हेही वाचा : 'माझी गर्लफ्रेण्ड हो आणि मी तुला...', Nora Fatehi ला सुकेश चंद्रशेखरने दिलेली खास 'ऑफर'

याविषयी सांगताना पुढे अली खान म्हणाला, हा एक स्मूच सीन आहे. ज्याला तुम्ही फ्रेंच किस देखील बोलू शकतात. हा सीन जेव्हा शूट करण्यात आला तेव्हा अजय देवगण सेटवर नव्हता. तर अली म्हणाला की हा सीन देण्याआधी त्यानं आणि काजोलनं तीन-चार दिवस सराव केला होता. सीन परफेक्ट मिळाल्यामुळे दिग्दर्शकांना आनंद झाला होता आणि मग काजोलनं देखील त्याचे आभार मानले.