पहिल्या प्रेमाच्या आठवणीत काजोलने शेअर केला खास फोटो...

फोटो पाहताना आपण जुन्या आठवणीत अगदी सहज रमतो. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2017, 01:13 PM IST
पहिल्या प्रेमाच्या आठवणीत काजोलने शेअर केला खास फोटो...  title=

नवी दिल्ली : फोटो पाहताना आपण जुन्या आठवणीत अगदी सहज रमतो. आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण आपले आवडते जुने फोटोज सोशल मीडियावर शेअर करतो. फोटो शेअर करण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील काही मागे नाहीत. अशीच एक जुनी आठवण बॉलिवूड अभिनेत्री काजोलने फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली. 

एक खास फोटो शेअर करत काजोल आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, "बघा मला काय मिळालं.... माझं पाहिलं प्रेम.." पण काजोलचं पहिलं प्रेम म्हणजे तिची आवडती कार. जी तिची पहिली कार आहे. 

काजोलने हा फोटो शेअर केल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरने यावर ट्विट केले की, "हा.. माझ्या लक्षात आहे.. कारण याच गाडीतून मी जखम देणारा प्रवास केला आहे." 

या फोटोत काजोल आपल्या आवडत्या गाडीवर बसली आहे. त्यात तिने व्हाईट शर्ट आणि ब्लु डेनिम घातली आहे. फोटोत काजोलचा लूक मस्त खुलून आलाय. 

काजोलने १९९९मध्ये अजय देवगणशी विवाह केला. तिला युग आणि न्यासा अशी दोन गोड मुले आहेत. काजोल तामिळ चित्रपटात धनुषसोबत झळकल्यानंतर अजूनही तिचे चाहते तिच्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.