शाहरुख-काजोलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

बॉलिवूडमधील काही ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांना चांगल्याच भावतात.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 12, 2018, 07:20 PM IST
शाहरुख-काजोलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... title=

मुंबई : बॉलिवूडमधील काही ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांना चांगल्याच भावतात. अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे शाहरूख आणि काजोल. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची वाहवा मिळते. त्यांना एकत्र पाहणे ही त्यांच्या फॅन्ससाठी पर्वणीच असते. मग हा योग लवकरच येणार आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

शाहरुख काजोल पुन्हा एकत्र

कारण किंग खानच्या आगामी चित्रपटात काजोलही झळकणार आहे. झिरो असे चित्रपटाचे नाव असून आनंद एल राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत

या चित्रपटात शाहरूखसोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भुमिका आहेत. तर काजोल आणि राणी मुखर्जी या पाहुण्या कलाकार म्हणून आपली उपस्थिती लावणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव शेअर करताना राणी म्हणाली की, ‘कुछ कुछ होता है २’साठी काम केल्यासारखे वाटले. कारण कुछ कुछ होता है हा शाहरूख-काजोल-राणी या प्रेमाच्या त्रिकूटाचा सुपरहिट चित्रपट ठऱला होता. 

काजोल-राणीने व्यक्त केल्या भावना

तर काजोल म्हणाली, आम्ही फक्त अर्ध्या तासासाठी शूटींग केले असेल पण शाहरूखसोबत काम करण्याचा आनंद नेहमीच वेगळा आणि खास असतो.

झिरोबद्दल उत्सुकता

झिरो चित्रपटात शाहरूख एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील स्टार कास्ट तर जबरदस्त असल्याने बॉक्स ऑफिसवरील चित्रपटाचा प्रतिसाद पाहणे औत्सुक्याचे ठरेल. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.