सर्वाधिक फी घेण्याच्या बाबतीत या अभिनेत्रीने दीपिकाला टाकलं मागे

बॉलिवूडची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

Updated: Oct 31, 2018, 01:31 PM IST
सर्वाधिक फी घेण्याच्या बाबतीत या अभिनेत्रीने दीपिकाला टाकलं मागे

मुंबई : 'पद्मावत' सिनेमा रिलीज झाल्यानंतर दीपिका पदुकोणला रणवीर सिंह आणि शाहिद कपूर पेक्षा जास्त फी दिली जात होती. याबाबत बोलताना दीपिकाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मी जास्त फीची डिमांड यासाठी केली कारण मी त्यासाठी पात्र होती. त्यानंतर बॉलिवूडमध्य़े सर्वाधिक फी घेणारी ती अभिनेत्री बनली होती. पण आता दीपिकाला मागे टाकत बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

रिपोर्ट्सनुसार कंगनाने 'मणिकर्णिका: दि क्वीन ऑफ झांसी'साठी 14 कोटी रुपये घेतले आहेत. ही आतापर्यंतची बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींची सर्वात जास्त फी आहे. कंगना म्हणते की, तिची फी तिच्या रोलवर अवलंबून असते. प्रत्येक भूमिका आणि सिनेमाची वेगवेगळी मागणी असते. त्यानुसार फी ठरते.

'मणिकर्णिका: दि क्वीन ऑफ झांसी' सुरुवातीपासूनच वादात आहे. हा सिनेमा आधी दिग्दर्शक केतन मेहता करणार होते पण कंगनाचा हस्तक्षेप जास्त वाढल्याने त्यांनी हा सिनेमा लांबच ठेवला. यानंतर कृष यांनी या सिनेमाची दिग्दर्शकांची जबाबदारी घेतली. पण कंगनामुळे त्यांनीही हा सिनेमा सोडला. त्यानंतर वाचलेल्या शुटींगची जबाबदारी कंगनाने स्वत:च घेतली. यानंतर सोनू सूद आणि अभिनेत्री स्वाती सेमवाल यांनी देखील सिनेमा सोडून दिला. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. 

बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातील फी अनेकदा वादाचं कारण बनली आहे. दीपिकाने लिंगच्या आधारावर फीमध्ये असमानता ठेवल्याने अनेकदा यावर नाराजी व्यक्त केली आहे.