शूटींग दरम्यान कंगना जखमी, रुग्णालयात केलं दाखल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत एका सिनेमाच्या शूटींग दरम्यान जखमी झाली आहे. जोधपूरमधील एका किल्ल्यात ही शूटींग सुरु होती.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 22, 2017, 01:48 PM IST
शूटींग दरम्यान कंगना जखमी, रुग्णालयात केलं दाखल

जयपूर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत एका सिनेमाच्या शूटींग दरम्यान जखमी झाली आहे. जोधपूरमधील एका किल्ल्यात ही शूटींग सुरु होती.

फायटिंगचा सीन करत होती शूट

कंगना फायटिंगचा एक सीन शूट करत असतांना जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा मणिकर्णिकाची शूटिंग सुरु होती.

कंगनाच्या पायाला दुखापत

बुधवारी सकाळी शूटिंग सुरु असतांना तिच्या पायाला दुखापत झाली. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या पायाला प्लास्टर लावण्यात आलं आहे. सध्या ती हॉलेलमध्ये परतली आहे. शूटींग थांबवण्यात आली असून ती आजच मुंबईला परत येणार आहे.

याआधीही झाली होती जखमी

शूटिंग जोधपूरमधील मेहरानगड किल्ल्यावर सुरु आहे. येथे रात्रीच्या वेळी शूटिंग सुरु होती. एक सीन शूट करत असतांना ती पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. याआधी देखील कंगनाला तलवार लागली होती. ज्यामुळे तिच्या चेहऱ्याला जखम झाली होती आणि काही टाके सुद्धा लागले होते.

पाहा व्हिडिओ

पुढच्या वर्षी होणार रिलीज

या सिनेमाचे लेखक के वी विजयेंद्र आहेत. के वी विजयेंद्र 'बाहुबली' सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांचे पिता आहेत. बाहुबलीच्या दोन्ही सिनेमांची कथा त्यांनीच लिहिली आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.