न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना राणौतचं ट्विट

कंगना राणौतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Updated: Oct 17, 2020, 05:13 PM IST
न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना राणौतचं ट्विट  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. असं असतानाही कंगनाने एक ट्विट केलं आहे. 

'महाराष्ट्रातील पप्पू सेना वेड्यासारखी वागत आहे', असं म्हणत पुन्हा एकदा कंगनाने ट्विट केलं आहे. सर्वजण नवरात्रात उपवास करीत आहेत? मी उपवास करत असल्याने आजच्या उत्सवांमधून क्लिक केलेली चित्रे, दरम्यान महाराष्ट्रात पप्पू सेना माझ्यावर गुन्हा दाखल करीत आहेत, मला लवकरच विसरु नका, कंगनाने असं ट्विट केलं आहे. 

मुस्लिम असल्याने आपल्याला काम न दिल्याचा आरोप करत, साहिल सय्यद याने वांद्रे न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान असा उल्लेख करतही तिने ट्विट केले होते.

त्या प्रकरणीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात शहरातील वकिलांनी बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन धार्मिक गटांमधील वैर वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता.