करण जोहरकडून आपल्या लग्नाबाबत मोठा खुलासा

लग्नाबाबत काय वाटतंय करणला 

करण जोहरकडून आपल्या लग्नाबाबत मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम आणि माय नेम इज खान या सिनेमाच दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे. करण जोहर 46 वर्षांचा असून अजून त्याचं लग्न झालेलं नाही. एका कार्यक्रमात विराट - अनुष्काच्या लग्नाचे फोटो बघून करण म्हणाला की, खरंच कुछ कुछ होता है....

सिनेमांप्रमाणेच करण जोहर टीव्ही आणि रेडिओ शो देखील करतोच. कॉफी विथ करण हा त्याचा हिट शो असून आता रेडिओवर 'कॉलिंग करण' शो चा दुसरा सिझन सुरू झाला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये करण जोहरने आपल्या लग्नाबद्दलचा एक मोठा खुलासा केला आहे. कॉलिंग करणच्या टेलिकास्टमध्ये आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. या शोमध्ये करण जोहरला विचारण्यात आलं की, तुम्हाला यातलं कूल वेडिंग कोणतं वाटतं? यावर करणने अनुष्का आणि विराट यांच लग्न खास वाटलं. करणने सांगितलं की, विरूष्काचं लग्न त्याला अतिशय कुल वाटतं. करणने सांगितलं की, याचं ड्रिम वेडिंग वाटलं. यांचे फोटो बघून मला देखील लग्न करावस वाटतं. 

करणने सांगितलं की, विरूष्काचे फोटो बघून मला खूप आनंद झाला होता. मी कधीच प्रायव्हेट वेडिंग करणार नाही. आपल्याला माहित आहे की, करण जोहरने अजून लग्न केलेलं नाही. मात्र करण जोहरला जुळी मुलं आहेत. ज्यांच नाव रूही आणि यश असं ठेवण्यात आलं आहे. करण जोहर यांची ही दोन मुलं सरोगसीने जन्माला आली आहेत. 2017 मध्ये करण जोहरने स्वतः याचा खुलासा केला