करण जोहरने शेअर केलेल्या फोटोतील चिमुकली ओळखलीत का?

शनिवारी करण जोहरने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. 

Updated: Jul 8, 2018, 04:59 PM IST
करण जोहरने शेअर केलेल्या फोटोतील चिमुकली ओळखलीत का?

मुंबई : शनिवारी करण जोहरने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील चिमुकलीने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 1999 सालच्या 'झी सिने अवॉर्डस'मधील हा खास फोटो आहे. करण जोहरने त्या सालचा बेस्ट डेब्यू डिरेक्टर अवॉर्ड पटकावला होता.  

इंस्टाग्रामवर शेअर केला खास फोटो 

करण जोहरने फोटो शेअर करताना हा # MejorThrowback  असल्याचं सांगितलं आहे. सोबतच हा फोटो अभिषेक बच्च्नमुळे मिळाल्याचं त्याने सांगितले आहे. या फोटोमध्ये करण जोहरसोबत सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा आणि चिमुरडी सोनाक्षी सिन्हा आहे. #DoubleChinAlert देताना या फोटोबाबतच्या आठवणी शेअर करताना सोनाक्षी तुला हा फोटो आठवतोय का? अवार्ड मी जिंकला असेल तर असं वाटत आहे जणू सारा सोहळा मीच खाल्ल्ला आहे. 

 

 

I have to thank @bachchan for sharing this with me! Remember this @aslisona ?? I have won an award but look like I ate the ceremony!!!! #majorthrowback #doublechinalert

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

1999  चा झी सिने अवॉर्ड ऐश्वर्या राय आणि अक्षय कुमारने होस्ट केला होता. हा फोटो पाहून सोनाक्षीनेही कमेंट केली आहे. त्यानुसार हे माझ्या आठवणीतील सोनेरी क्षण आहेत, हे मी कसे विसरू शकेन अशा आशयाचे त्यावर कमेंट केले आहे. 

फीटनेस फ्रिक सेलिब्रिटी - 

सोनाक्षी सिन्हा आणि करण जोहर या दोघांनाही त्यांच्या फीटनेसवर मेहनत घेतली आहे. सोनाक्षीने दबंगपूर्वी 30 किलो वजन घटवले आहे. तर करण जोहरनेही आता चांगलंच वजन घटवले आहे.