करीना-सैफच्या नात्याबद्दल 'या' अभिनेत्याला सगळ्यात पहिल माहित होतं

सगळ्यांपासून लपवली होती ही गोष्ट 

Updated: Dec 7, 2019, 04:23 PM IST
करीना-सैफच्या नात्याबद्दल 'या' अभिनेत्याला सगळ्यात पहिल माहित होतं

मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानची जोडी सिनेजगतात अतिशय लोकप्रिय आहे. यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. महत्वाचं म्हणजे सैफीना यांच्यात 10 वर्षांच अंतर आहे. मात्र या दोघांच्या नात्यात याचा कोणताच फरक पडलेला नाही. नुकतच करीना आणि सैफच्या नात्याबद्दल करीनाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जी या सात वर्षात कुणालाच माहित नव्हती. 

हिंदुस्तान टाइम्सच्या समित 2019 मध्ये करीनाने याचा खुलासा केला आहे. यावेळी तिच्यासोबत 'गुड न्यूज' सिनेमातील सहकलाकार अक्षय कुमार देखील होता. या कार्यक्रमात करीनाने सैफ आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दलची महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. सैफ-करीनाच्या नात्याबद्दल सगळ्यात अगोदर माहित असलेली व्यक्ती म्हणजे अक्षय कुमार. करीनाच्या मनात सैफबद्दल प्रेमाची भावना होती ही गोष्ट सर्वात अगोदर बॉलिवूडमध्ये फक्त अक्षयला माहित होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

About today for the HT Summit Awards 2019 with @akshaykumar

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

महत्वाचं म्हणजे अक्षयने देखील ही गोष्ट सिक्रेट ठेवली होती. अक्षय माझा खूप चांगला मित्र आहे. मला त्याची हीच गोष्ट खूप आवडते. अक्षयला सगळ्या गोष्टी माहित असून त्याने कधीच कुणाला काही सांगितलं नाही, असं करीना सांगते. अक्षय आणि करीनाचं कुटूंब एकमेकांच्या खूप जवळ आहेत. याच महत्वाचं कारण म्हणजे करीना आणि अक्षयचा रूम एकमेकांच्या अगदी बाजूला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hai sauda khara khara  @akshaykumar

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

अक्षय आणि करीनाचा 'गुड न्यूज' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 27 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दोघांव्यतिरिक्त दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी देखील आहे. या अगोदरही करीना आणि अक्षयने एकत्र काम केलं आहे.