'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'ऐशोआराम पैशाने विकत घेता येत नाहीत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

करीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की "लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत"  

शिवराज यादव | Updated: Aug 30, 2024, 08:31 PM IST
'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'ऐशोआराम पैशाने विकत घेता येत नाहीत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला सध्या इंस्टाग्रामला ट्रोल केलं जात आहे. नुकतंच तिने इंस्टाग्रामला हॉलिवूड दिग्दर्शक क्लिंट ईस्टवूड यांचं एक वाक्य शेअर केलं. ज्यामध्ये ऐशोआराम हा पैशांमध्ये नाही, तर आयुष्यातील छोट्या आनदांमध्ये आहे असं सांगितलेलं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी स्वत:कडे पतौडी पॅलेस असणारी अभिनेत्री हे सांगत आहे असा टोला लगावत विरोधाभास दाखवला आहे. 

करीनाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये 94 वर्षीय क्लिंट ईस्टवूड यांचा कोट पोस्ट केला आणि त्यासोबत लिहिलं की, “हे वांरवार वाचा (रेड हार्ट इमोजी).” या कोटमध्ये म्हटलं आहे की आहे, “घड्याळांमध्ये किंवा ब्रेसलेटमध्ये ऐशोआराम शोधू नका, ते हवेली किंवा नौकामध्ये शोधू नका; ऐशोआराम म्हणजे मित्र आणि हसणे, ऐशोआराम म्हणजे आजारी नसणं, ऐशोआराम म्हणजे चेहऱ्यावर पडणारा पाऊस आणि ऐशोआराम म्हणजे मिठ्या आणि किस. स्टोअरमध्ये किंवा भेटवस्तूंमध्ये ऐशोआराम शोधू नका, पार्टी किंवा कार्यक्रमांमध्ये ते शोधू नका. ऐशोआराम  म्हणजे लोक तुमच्यावर प्रेम करतात, ऐशोआराम म्हणजे ते तुमचा आदर करतात, ऐशोआराम म्हणजे तुमचे आई-वडील जिवंत आहेत, ऐशोआराम म्हणजे तुमच्या नातवंडांसोबत खेळणे, ऐशोआराम म्हणजे त्या छोट्या गोष्टी ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत".

करीनाच्या या इंस्टाग्राम स्टोरीवरुन अनेकांनी टोला लगावला असून नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने स्टोरीची स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे की, “मला हसू आलं. ऐशोआरामात जगणारे लोक जीवनात ऐशोआराम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट कशी नाही याबद्दल बोलतात". पुढे म्हटलं आहे, “येथे द्वेष किंवा मत्सर नाही, पण मला ते नेहमी मजेदार वाटतं जेव्हा गडगड श्रीमंत लोक जीवनात पैसा हे सर्व काही कसे नाही याबद्दल पोस्ट करतात. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आयुष्यात तुमच्याकडे काही नसतं तेव्हा तुमचं प्राधान्य वेगळं असतं".

अनेक युजर्सनी करीनाला ट्रोल केलं आहे. “जसे मायकेल कॉर्लिऑनने गॉडफादर 2 मध्ये म्हटलं आहे की, ‘पैशाची ही अवहेलना ही श्रीमंतांची आणखी एक युक्ती आहे जे गरीबांना त्याशिवाय ठेवते.’ दुसऱ्याने लिहिले, “या महिलेकडे पतौडी पॅलेस आहे आणि ती दरवर्षी Gstaad ला जाते. एकाने म्हटलं आहे की “ते त्यांच्याच आयुष्यात राहतात. त्यांच्या जीवनातून ऐशोआरम काढून टाका, मग आम्ही पाहू”.

यादरम्यान काहींनी करीनाची बाजूही मांडली आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना तो कमवायचा आहे. पण ज्यांच्याकडे आहे त्यांना पैसा सर्व काही नाही याची जाणीव होते असं एक युजर म्हणाला आहे.  

दरम्यान चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास करीना आता 'द बकिंघम मर्डर्स', 'सिंघम अगेन' आणि मेघना गुलजारच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे.