अमिताभ बच्चन 'वाईट व्यक्ती' करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत   

Updated: Nov 27, 2021, 10:31 AM IST
अमिताभ बच्चन 'वाईट व्यक्ती' करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन कायम त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता देखील त्यांनी फार जुने क्षण आणि त्या क्षणाचा एक फोटो पोस्ट केला आहे. बिग बीनीं त्यांच्या कारकिर्दित अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. त्यामधील एक म्हणजे अभिनेते रणधीर कपूर. जेव्हा रणधीर आणि अमिताभ शूटिंग करत होते तेव्हा अभिनेत्री करीना कपूर त्याठिकाणी होती. 

तेव्हा बिग बी एक वाईट व्यक्ती आहेत असा करीनाचा समज झाला. पण बिग बींनी अशी एक शक्कल लढवली ज्यामुळे करीनाला बिग बी चांगले वाटू लागले. तेव्हा बिग बींनी करीनाचे पाय धूतले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

नक्की काय आहे प्रकरण
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर पुकार (1983) सिनेमातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, जेव्हा त्यांनी रडणाऱ्या करीनाचे पाय धुतले तेव्हा तिला खात्री पटली की मी वाईट व्यक्ती नाही. 2013 मध्ये त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. 

शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी रणधीर कपूरला मारहाण केली तेव्हा छोटी करीना खूप नाराज झाली. बिग बींनी लिहिले की, करीनाने रणधीर यांना वाचवण्यासाठी माझे पाय घट्ट धरले.  बिग बी म्हणाले, 'ती खूप अस्वस्थ आणि काळजीत होती. तिचे थोडे मनोरंजन करण्यासाठी मी पाणी मागितले आणि तिचे छोटे पाय स्वच्छ केले. 

'मला वाटते पाय धुतल्यानंतर तिचे माझ्याबद्दलचं मत बदललं. हा क्षण मलाही आठवतो आणि करिनालाही.' असं देखील बिग बींनी ब्लॉगमध्ये मांडलं आहे. अमिताभ बच्चन यांनी 2019 मध्ये एक फोटो शेअर केला होता. 

हा फोटो 'पुकार'च्या सेटवरील होता. यामध्ये करीना रडताना दिसली. अमिताभ बच्चन यांनी लिहिले,  'ओळखा कोण? गोव्यातील पुकारच्या सेटवर ही करीना कपूर आहे. वडील रणधीर कपूरसोबत आली होती... पायाला दुखापत झाली आणि मी तिच्या पायाला औषध लावत होतो....' सध्या बिग बींची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.