कतरिना कैफची वार्षिक कमाई ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल

कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चा आहेत.

Updated: Nov 14, 2021, 10:54 PM IST
कतरिना कैफची वार्षिक कमाई ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल title=

मुंबई : 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या खूप खुश आहे. तसंच कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चाही सतत चर्चेत असतात. कतरिना कैफ तिच्या अभिनयातून किती कमाई करते हे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कतरिना कैफ केवळ चित्रपटातूनच नाही तर तिच्या स्वत:च्या मेकअप ब्रँडमधूनही वर्षाला करोडोंची कमाई करते. कतरिनाच्या मेकअप ब्रँडचे नाव ब्युटी आहे.

कतरिना कैफची वार्षिक कमाई 224 कोटी रुपये आहे. कतरिनाची कमाई सिनेमा, ब्रँड जाहिती, मॅगझिन फीचर्स, तिच्‍या ऑटोच्‍या मेकअप ब्रँडमधुन येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना एका चित्रपटासाठी 11 कोटी रुपये मानधन घेते. त्याचवेळी कतरीनाला एक जहिरतीसाठी ६ ते ७ कोटी रुपये दिले जातात.

कतरिना कैफनेही तिची स्वतःची ब्यूटी प्रोडक्ट बाजारात आणली आहेत. झोया अख्तरने कतरिनाच्या 'के ब्युटी' साठी जाहिरात शूट केलं. ज्यामध्ये तिने राजा कुमारी, सायना नेहवाल, कुशा कपिला यांच्यासह अनेकांना कास्ट केलं होतं. फोर्ब्स 2019 नुसार, कतरिना भारतातील 23 वी सर्वाधिक कमाई करणारी सेलिब्रिटी आहे. कतरिना कैफचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. सूर्यवंशीनंतर कतरिना कैफने तिच्या पुढील प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.