"कोण कुठला Vicky Kaushal, माझ्या मनात...", लग्नानंतर कतरिनाचं Koffee With Karan 7 मध्ये धक्कादायक वक्तव्य

कार्यक्रमात नेहमीप्रमाणे करण जोहरने कलाकारांना बोलतं केलं. कतरिना कैफने विकी कौशलसोबत असलेल्या रिलेशनबाबत खुलासे केले.

Updated: Sep 7, 2022, 04:28 PM IST
"कोण कुठला Vicky Kaushal, माझ्या मनात...", लग्नानंतर कतरिनाचं Koffee With Karan 7 मध्ये धक्कादायक वक्तव्य title=

Katrina Kaif Said About Vicky Kaushal: करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 (Koffee With Karan 7) या कार्यक्रमात नुकतीच फोन भूतच्या कलाकारांनी हजेरी लावली. या चित्रपटात कतरिना कैफ, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि इशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. या सिझनमधील कार्यक्रमात पहिल्यांदाच तीन कलाकारांनी एकत्र हजेरी लावली होती. 
या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे करण जोहरने कलाकारांना बोलतं केलं. यावेळी कलाकारांनी रोमांस, प्रेम आणि मधुचंद्राच्या रात्रीबाबत आपले सीक्रेट रिलीज केले. या दरम्यान कतरिना कैफने विकी कौशलसोबत असलेल्या रिलेशनबाबत खुलासे केले. विकी कौशलबाबत मी कधीही विचार केला नव्हता, असं कतरिना कैफने सांगितलं.

कॉफी विथ करण 7 या कार्यक्रमात कतरिना म्हणाली, “मला त्याच्याबद्दल फारसं काहीच माहिती नव्हतं. मी फक्त त्याचं नाव ऐकले होते. त्या व्यतिरिक्त काहीही संबंध नव्हता. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मी त्याचीच होऊन गेली.” कतरिना कैफनं पुढे सांगितलं की,  “हे माझे नशीब होते आणि असंच घडायचे होते. असे बरेच योगायोग होते." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, विकी याआधी सिद्धार्थ मल्होत्रासोबत कॉफी विथ करण या सीझनमध्ये दिसला होता. कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्नगाठ बांधली. लग्नाआधी ते त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलले नव्हते.